मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना बोनसचे गिफ्ट

गेल्या 18 महिन्यांच्या कठीण काळात जे घडले ते या आधी कधी कोणी पाहिले नव्हते. अशा कठीण प्रसंगी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 1,500 डॉलर्स म्हणजे 1.12 लाख इतका बोनस भेट म्हणून जाहीर केला आहे.
मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 1,500 डॉलर्स म्हणजे 1.12 लाख इतका बोनस भेट म्हणून जाहीर केला आहे.
मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 1,500 डॉलर्स म्हणजे 1.12 लाख इतका बोनस भेट म्हणून जाहीर केला आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात मागील वर्षे सर्वलोकांसाठी कठीण होते. कोरोनाचा फैलाव संपूर्ण देशभर पसरलेला असताना सर्व जग लॉकडाऊन झाले होते. गेल्या 18 महिन्यांच्या कठीण काळात जे घडले ते या आधी कधी कोणी पाहिले नव्हते. अशा कठीण प्रसंगी मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी (employees) 1,500 डॉलर्स म्हणजे 1.12 लाख इतका बोनस भेट (Bonus gift) म्हणून जाहीर केला आहे.

याबाबत बोलताना मायक्रोसॉफ्टचे मुख्य अधिकारी कॅथलिन होगन म्हणाले, मागील वर्षे हे सर्वांसाठीच अव्हानात्मक असे होते. कर्मचाऱ्यांना अडचणीत मदत करण्यासाठी आणि त्यांना खूश ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही अमेरिकेसह सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात येईल. यामध्ये अर्धावेळ कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 1,500 डॉलर्स म्हणजे 1.12 लाख इतका बोनस भेट म्हणून जाहीर केला आहे.
Kelly Jacobs: 2032 मध्ये तुरूंगातून सुटणाऱ्या कैद्याच्या प्रेमात पडली केली

यासाठी सुमारे 200 मिलियन डॉलर इतका खर्च येणार आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये एकूण 1.75 लाख कर्मचारी आहेत. मायक्रोसॉफ्ट ही तीन कंपन्यांची मालकी आहे. या तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना हा फायदा मिळेल.

सीएनबीसीच्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांना दिला जाणारा हा बोनस म्हणजे त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्नाचा एक भाग आहे. कोरोना काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर काही स्वतःहून नोकरी सोडत आहेत. यासाठी फेसबुक, ऑमेझॉन यासारख्या कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांसाठी बक्षिस दिली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com