पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील गुजरानवाला (Gujranwala) जिल्ह्यात सिलेंडरचा स्फोट झाला आहे . रविवारी रात्री उशिरा कॅंट पोलीस स्टेशनच्या शहा कोट परिसरातील गुजरानवाला येथे पॅसेंजर व्हॅनमध्ये सिलिंडर स्फोट (Cylendra Blast) होऊन किमान नऊ जण ठार झाले तर सात जण जखमी झाले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Blasts in Pakistan). या भीषण घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि प्रवासी व्हॅनमधील आग विझवण्यासाठी बचाव कार्य केले मात्र याला खूप उशीर झाला होता. कारण जे जखमी झाले आहेत त्यांची परिस्थितीही नाजूक सांगितले जात आहे.(Blasts in Pakistan in Quetta & Gujranwala kills 11 people)
पाकिस्तानचे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांनी गुजरानवाला येथे व्हॅन आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांनी आयुक्त आणि आरपीओकडून अहवाल याबद्दलची सखोल माहिती मागितली आहे. एका न्यूज ऍजेंसीचीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना त्वरित सर्वसमावेशक चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या सदैव अस्थिर असणाऱ्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान (Balochistan) प्रांताची राजधानी क्वेटामध्ये (QuettaBlast) रविवारी एका लक्झरी हॉटेलजवळ वाहनाला लक्ष्य करून शक्तिशाली स्फोट करण्यात आला आहे . यात किमान दोन पोलिसांचा मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले आहेत.
हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या दरवाजे आणि खिडक्या निघून पडल्या आहेत. क्वेट्टामधील स्फोटाची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारली नसली तरीही या प्रांतात बलुच राष्ट्रवादी सक्रिय आहेत. ते अनेकदा सुरक्षा दलांना लक्ष्य करतात. आणि त्यांनीच हा स्फोट घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.