Kabul Blast: मशिदीत झालेल्या स्फोटात इमामसह 20 जण ठार, 40 जण जखमी

तालिबानच्या सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तालिबानचा प्रतिस्पर्धी आयएसने गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात हल्ले तीव्र केले आहेत.
Kabul  Blast
Kabul BlastANI
Published on
Updated on

Kabul Blast: काबूलमध्ये खळबळ उडाली असून, एकापाठोपाठ एक स्फोटांच्या प्रतिध्वनीने राजधानी हादरली आहे. यावेळी तेथील एका मशिदीला लक्ष्य केले आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये नमाजाच्या वेळी मशिदीत झालेल्या स्फोटात 30 जण ठार झाले, तर या हल्ल्यात 40 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Kabul  Blast
Russia: 'रशियाकडून भारत आमचं रक्त विकत घेतोय', युक्रेनियन परराष्ट्रमंत्र्यांची टीका

सर्वत्र पसरलेला मृत्यूचा हा शोक, अफगाणिस्तानच्या भूमीवर तालिबानच्या सत्तेवर परत आल्याची साक्ष आहे. हा स्फोट मगरिबच्या नमाजाच्या वेळी झाला, ज्यामध्ये मशिदीचे इमाम अमीर मोहम्मद काबुली हे देखील ठार झाले. मात्र, तालिबानच्या सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर तालिबानचा प्रतिस्पर्धी आयएसने गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात हल्ले तीव्र केले आहेत. आणि या हल्ल्यामागे त्याच दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे.

Kabul  Blast
Pakistan: लसीकरणास मानला नसबंदी करण्याचा कट! पाकिस्तानात 2 पोलिस ठार

काबूलच्या आपत्कालीन रुग्णालयाने ट्विटरवर सांगितले की, सात वर्षांच्या मुलासह एकूण 27 जखमी रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. 27 जखमींपैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दोन जणांचा मृत्यू झाला तर एकाचा आपत्कालीन कक्षात मृत्यू झाला. अफगाणिस्तानचे आणीबाणीचे देश संचालक, स्टेफानो सोझा यांनी सांगितले की, पाच अल्पवयीन मुलांसह एकूण 27 लोकांना शस्त्रक्रिया केंद्रात आणण्यात आले होते, ज्यात 7 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com