Biparjoy: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बीपरजॉय वादळ आता पाकिस्तानकडे मार्गक्रमण करत आहे. हे वादळ आता 15 जूनला पाकिस्तानच्या करामध्ये पोहचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बीपरजॉयची तीव्रता पाहता ज्या भागात बीपरजॉयचा तडाखा बसणार आहे त्या भागातील लोकांना दक्षतेचा इशारादेखील हवामान विभागाने दिला आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लोकांना बीपरजॉयचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने तेथील 1लाख नागरिकांना रेस्कू करण्यासाठी सैन्याला तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, बीपऱजॉयने आत्यंतिक गंभीर वादळापासून आता गंभीर स्वरुप धारण केले आहे.
आता हे वादळ कराचीपासून 410 किलोमीटर दूर आहे. पुढे हवामान विभागाने असेही म्हटले आहे की 17-18 जूनपर्यत याची तीव्रता कमी होईल. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी पुढील 72 तास महत्वाचे मानले जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, या वादळादरम्यान, 140-150किलोमीटर प्रतितास हवेचा वेग दिसून येण्याची शक्यता आहे. याशिवाय बीपरजॉयच्या केंद्रस्थानी 170 किलोमीटर प्रतितास हवेचा वेग असण्याची शक्यता पाकिस्तानच्या हवामान विभागाने वर्तवली जात आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रातांला बीपरजॉयचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाहने यांनी आणबाणी घोषित केली आहे. याबरोबरच सेना आणि नौसेनेला सिंधच्या 80,000 नागरिकांना सुरक्षितस स्थळी पोहचवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाला बांग्लादेशने नाव दिले आहे. बीपरजॉय हा बंगाली शब्द असून त्याचा अर्थ आपत्ती किंवा संकट असा होतो. WMO आणि युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन (ESCAP) च्या सदस्य देशांकडे चक्रीवादळांना नाव देण्याची एक विशिष्ट प्रणाली आहे. त्यानुसाल वादळांना नावे दिली जातात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.