बिल गेट्स यांनी शेअर केला 48 वर्ष जुना CV, नोकरी शोधणाऱ्यांना दिला खास संदेश

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी अलीकडेच आपला 48 वर्षांपूर्वीचा रेझ्युमे शेअर केला
Bill Gates
Bill GatesDainik Gomantak
Published on
Updated on

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना जगात कोण ओळखत नाही. त्यांनी मिळवलेले यश बहुतेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. बिल गेट्सने जगाला सांगितले की, या जगात कोणतीच गोष्ट असाध्य नाही. एका मनुष्याची सर्व स्वप्न नक्कीच सत्यात उतरतात, मात्र त्यासाठी त्याला कठोर परिश्रम घेणे आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. बिल गेट्सचा रेझ्युमे (Resume) सध्या खूप चर्चेत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तीसाठी रेझ्युमे म्हणजे काय असतं हे आपण सर्वच जाणून आहे. ((Bill Gates Resume)

नोकरी मिळविण्यासाठी, रेझ्युमे असणे खूप आवश्यक आहे. त्यात तुमची पात्रता, अनुभव आणि कौशल्ये चांगल्या प्रकारे हायलाईट होतात. म्हणून नोकरीसाठी रेझ्युमे सर्वात महत्वाचा मानला जातो. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी अलीकडेच आपला 48 वर्षांपूर्वीचा रेझ्युमे शेअर केला आहे. आजचा रेझ्युमे त्यांच्या या रेझ्युमे पेक्षा खूप चांगला आहे याची मला खात्री आहे, असे कॅप्शन त्यांनी हा रेझ्युमे शेअर करतांना दिले आहे.

Bill Gates
चीनच्या शिनजियांग भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप! 4 जणांचा मृत्यू तर 41 जखमी

गेट्सने शेअर केलेल्या 1974 सालच्या रेझ्युमेमध्ये त्याचे नाव विल्यम एच. गेट्स आहे. हार्वर्ड कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिकत असतानाची ही गोष्ट आहे. बिल गेट्स यांनी त्यांच्या बायोडेटामध्ये नमूद केले आहे की त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट, कंपाइलर कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स सारखे कोर्स केले आहेत. रेझ्युमेमध्ये असे लिहिले आहे की त्यांना फोरट्रान, कोबोल, एल्गोल, बेसिक इत्यादी सर्व प्रमुख प्रोग्रामिंग भाषांचा अनुभव आहे.

त्यांनी 1973 मध्ये TRW सिस्टम्स ग्रुपमध्ये सिस्टम प्रोग्रामर म्हणून त्यांच्या अनुभवाचा उल्लेख केला. बिल गेट्स यांनी 1972 मध्ये लेकसाइड स्कूल, सिएटल येथे सह-नेता आणि सह-भागीदार म्हणून त्यांचा कार्यकाळ शेअर केला. त्यांचा हा बायोडाटा पाहिल्यानंतर लोकांनीही सोशल मीडियावर वेगाने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे.

Bill Gates
Afghanistan: अफगाण महिलांच्या आत्महत्येत वाढ, माजी उपसभापतींचा खुलासा

अनेक सोशल युजर्सनी सांगितले की बिल गेट्सचा रेझ्युमे परफेक्ट आहे, हा रेझ्युमे 48 वर्षां आधीचा असला तरी तो अजूनही छान दिसतो, बिल गेट्स, ग्रेट वन पेज रेझ्युमे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपण सर्वांनी परत जाऊन आपल्या मागील रेझ्युमेच्या प्रती पाहिल्या पाहिजेत, अशा काही प्रतिक्रिया या पोस्टवर युजर्स देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com