'भारताशी मैत्री करणं अनिवार्य', पाकिस्तानी मंत्र्यांने दिला शाहबाज सरकारला सल्ला

पाकिस्तानने परराष्ट्र धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे.
Bilawal Bhutto-Zardari
Bilawal Bhutto-ZardariDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानने परराष्ट्र धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये खूप कटुता दिसून आली. मात्र आता पाकिस्तान हे संबंध सुधारण्यासाठी पावले उचलत आहे. याचा मोठा फटका पाकिस्तानला सहन करावा लागत आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला शाहबाज सरकारला दिला आहे. (bilawal bhutto want good relations with india pakistan)

दरम्यान, बिलावल भुत्तो-झरदारी (Bilawal Bhutto-Zardari) यांनी गुरुवारी भारतासोबतचे संबंध पूर्ववत करण्याचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, ''नवी दिल्लीशी संबंध तोडणे देशाच्या हिताचे नाही कारण इस्लामाबाद (Islamabad) आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडले आहे.''

Bilawal Bhutto-Zardari
पैगंबर विवाद: भारताविरोधात पाकिस्तान चालवतोय सोशल मीडियावर 'नापाक' मोहिम

काश्मिरी रागही आवळला

खरं तर, बिलावल इस्लामाबादमधील इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या स्थापना दिनाच्या समारंभाला संबोधित करत होते. बिलावल म्हणाले, ''भारतासोबत आमच्या काही समस्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध आणि संघर्षाचा मोठा इतिहास आहे. आजही आमच्यात अनेक वाद होतात. ऑगस्ट 2019 च्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या दिवशी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. भारताने (India) संविधानातील कलम 370 रद्द केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील संबंधात कटुता आली.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com