'हा' आशियाई देश आयोजित करणार होता सर्वात मोठा 'सेक्स फेस्टिव्हल', 24 तास आधी करावा लागला रद्द; वाचा नेमकं काय घडलं?

South Korea: आशियाई देश दक्षिण कोरिया आपला पहिला आणि सर्वात मोठा सेक्स फेस्टिव्हल आयोजित करणार होता.
Japani Girl
Japani GirlDainik Gomantak

South Korea: आशियाई देश दक्षिण कोरिया आपला पहिला आणि सर्वात मोठा सेक्स फेस्टिव्हल आयोजित करणार होता, ज्यामध्ये जपानी पोर्न स्टार्सना आमंत्रित करणे, अडल्ट गेम्स स्पर्धा आणि सेक्स टॉयचे प्रात्यक्षिक यांसह अनेक कार्यक्रमांचा समावेश होता. मात्र, गदारोळानंतर हा फेस्टिव्हल सुरु होण्याच्या अवघ्या 24 तास आधी रद्द करण्यात आला. फेस्टिव्हल रद्द होण्यामागचे सर्वात मोठे कारण पुरुषांनी तिकीट खरेदी करण्याशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी अडल्ट क्रियाकलापांबाबत पुराणमतवादी दृष्टिकोन बाळगणाऱ्या दक्षिण कोरियाला यावेळी सेक्स फेस्टिव्हलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. खास आमंत्रित जपानी पोर्न स्टार्स पाहण्यासाठी सेक्स फेस्टमध्ये हजारो लोक येतील अशी आयोजकांना खात्री होती. या फेअरमध्ये फॅशन शो, सेक्स टॉय प्रदर्शन आणि अडल्ट गेम्स स्पर्धांचाही समावेश होता. मात्र, हा फेस्टिव्हल सुरु होण्याच्या अवघ्या 24 तास आधी तो रद्द करण्यात आला. Lee Hye-tae ची कंपनी PlayJoker कायदेशीर मर्यादेत राहून पोर्न व्हिडिओ बनवते. आयोजनकर्त्यांपैकी एक असेलल्या Lee Hye-tae म्हणाली की, 'अशाप्रकारच्या सेक्स फेस्टिव्हलचे आयोजन मला करायचे होते. दक्षिण कोरियात अशाप्रकारची संस्कृती नाहीये. मला यासंबंधी पहिले पाऊल टाकायचे होते. शेजारील देशांमध्ये अशा फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे.'

Japani Girl
America China Tension: अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा तणाव; चिनी विद्यार्थ्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा ड्रॅगनचा आरोप

सेक्स फेस्टिव्हलवरुन प्रचंड गदारोळ

दुसरीकडे, सेक्स फेस्टिव्हल आयोजित करण्याच्या महिनाभरापूर्वीच देशभरात गदारोळ सुरु झाला होता. एका महिला संघटनेने सुवॉन शहरात निदर्शने केली, जिथे हा फेस्टिव्हल होणार होता. Lee Hye-tae च्या कंपनीवर महिलांचे शोषण केल्याचे अनेक आरोप करण्यात आले. हा फेस्टिव्हल स्त्री-पुरुषांसाठी नसून तिकीट खरेदी करणाऱ्या बहुसंख्य पुरुषांसाठी आहे, असे संघटनेचे मत आहे. दरम्यान, शहराच्या महापौरांनीही हा फेस्टिव्हल एका प्रायमरी स्कूलजवळ आयोजित केला जात असण्यावरुन टीका केली होती. अधिकाऱ्यांनी फेस्टिव्हल आयोजित केल्यास कंपनीचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली होती. आता याच धमकीनंतर हा फेस्टिव्हल रद्द करण्याची आयोजकांवर नामुष्की ओढावली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com