पेगॅसस प्रकरणाविरोधात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा मोठा निर्णय

एनएसओ समूहाद्वारे तयार करण्यात आलेल्या स्पायवेअर (Spyware) संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमधील संभाषण, संदेश आणि इतर माहिती उघड करण्यात येत असते.
Emmanuel Macron
Emmanuel MacronDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात पेगॅसस प्रकरणामुळे (Pegasus Case) मोठी खळबळ उडाली आहे. इस्त्रायलच्या (Israel) एनएसओ संस्थेने तयार केलेल्या पेगॅससचा या स्पायवेअरचा वापर करत जगभरातील 12 देशांच्या प्रमुखांवर पाळत ठेवण्यात आलं असल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही माजी पंतप्रधान आणि राजांचाही यामध्ये समावेश आहे. यामध्ये फ्रान्सच्या अध्यक्षांचाही समावेश आहे. एनएसओ समूहाद्वारे तयार करण्यात आलेल्या स्पायवेअर (Spyware) संबंधित व्यक्तीच्या मोबाईलमधील संभाषण, संदेश आणि इतर माहिती उघड करण्यात येत असते.

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी पेगॅसस प्रकरणासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. मॅक्रॉन यांनी आपला मोबाईल नंबर बदलला आहे. यांसंबंधीची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. फ्रान्स सरकारकडून पेगॅसस प्रकरणाविरोधात फ्रान्स सरकारकडून घेण्यात आला असलेला मोठा निर्णय आहे.

Emmanuel Macron
अफगाणिस्तान विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केलेला फरारी जॉँटी कोईआ गजाआड

मॅक्रॉन यांच्यांकडे अनेक मोबाईल नंबर आहेत. मात्र त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत नाही असं बिलकुल नाही. हा फक्त अतिरिक्त सुरक्षेच्या संबंधीत भाग आहे. असं अधिकाऱ्यांनी माध्यामांशी बोलताना सांगितले आहे. पेगॅसस प्रकरण उघड केल्यानंतर राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेशी काळजी घेतली जात असल्याचे मॅक्रॉन सरकारचे प्रवक्ते गॅब्रियल यांनी सांगितले आहे.

एनएसओद्वारा तयार करण्यात आलेले पेगॅसस स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या 16 सदस्यांनी हा प्रकार उघड केला आहे. 2019 मध्ये राष्ट्राध्याक्ष मॅक्रॉन यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टीवर होते, ल मॉंद या वृत्तपत्राने म्हटलं आहे. तसेच पॅरिसचे अभियोक्ता कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. एनएसओला यामध्ये डिजिटल ओशनच्या माध्यामातून अ‍ॅमेझॉन वेब सव्र्हिसेसने मदत केली होती. मात्र दुसरीकडे डिजिटल ओशन कंपनीने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले किंवा स्वीकारलेले नाहीत, असं असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

Emmanuel Macron
बायडन यांचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण; टेक ऑफसाठी ''अमेरिका'' सज्ज

इम्युनल मॅक्रॉन यांच्यासह 14 जणांचे मोबाईल हॅक

फ्रान्सचे राष्ट्रध्याक्ष मॅक्रॉन यांच्यासह चौदा जणांचे मोबाईलप फोन स्पायवेअरच्या माध्यमातून हॅक करण्यात आले आहेत. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी म्हटले की, ही अतिशय धक्कादायक अशी बाब आहे. त्यामुळे जागतिक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुमारे पन्नास हजार मोबाईल फोनमधील माहिती या धोकादायक स्पायवेअरच्या माध्यमातून उघड करण्यात आली आहे. पॅरिसमधील फॉबिडन स्टोरीज या संस्थेने हा प्रकार जगासमोर आणला आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी या जागतिक नेत्यांचा यायादीमध्ये समावेश असल्याचे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com