Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगला मोठा झटका! कॅनडाने 'दहशतवादी संघटना' म्हणून केले घोषित, संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा

Terrorist Organization: आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगला सोमवारी (29 सप्टेंबर) कॅनडा सरकारने मोठा धक्का दिला.
Gangster lawrence bishnoi
Gangster lawrence bishnoiDainik Gomantak
Published on
Updated on

Lawrence Bishnoi Gang: आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगला सोमवारी (29 सप्टेंबर) कॅनडा सरकारने मोठा धक्का दिला. कॅनडाने बिश्नोई गँगला अधिकृतरित्या 'दहशतवादी संघटना' (Terrorist Organization) म्हणून घोषित केले. कॅनडामध्ये या गँगचे वाढते गुन्हे, गोळीबार आणि वसुलीच्या (Extortion) वाढत्या कारवाया पाहता सरकारने हे कठोर पाऊल उचलले.

संपत्ती गोठवणार, दहशतवादी कारवायांना चाप

दरम्यान, या घोषणेमुळे कॅनडा सरकारला बिश्नोई गँगशी संबंधित कोणतीही मालमत्ता जसे की, पैसा, गाड्या किंवा अन्य प्रकारची स्थावर मालमत्ता कॅनडामध्ये गोठवण्याचा (Freeze) किंवा जप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला.

कॅनडा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, बिश्नोई गँग ही एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटना आहे, जी प्रामुख्याने भारतातून कार्यरत आहे. "या गँगची उपस्थिती कॅनडामध्येही आहे, विशेषतः अशा भागात जिथे भारतीय समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात," असे सरकारने स्पष्ट केले.

Gangster lawrence bishnoi
Lawrence Bishnoi: 'लॉरेन्स बिश्नोई'ची टोळी गोव्यात, हणजुण पोलिसांनी सात जणांना घेतलं ताब्यात

मंत्री गॅरी आनंदसंगरी यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, "कॅनडामध्ये हिंसाचार आणि दहशत पसरवणाऱ्या कृत्यांना थारा नाही. देशात अशा बेकायदेशीर कारवाया आम्ही कदापि खपवून घेणार नाही. याच कारणामुळे कॅनडा सरकारने क्रिमिनल कोडअंतर्गत बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.''

Gangster lawrence bishnoi
Lawrence Bishnoi : सलमान खान, सिद्धू मुसेवालाचा मॅनेजर, 'लॉरेन्स'च्या निशाण्यावर 10 लोक 'राष्ट्रीय तपास यंत्रणे'ला सांगितला प्लॅन....

पोलीस आणि कायद्याला अधिक बळ

बिश्नोई गँगचे गुन्हेगारी स्वरुप कॅनडा सरकारने उघड केले आहे. ही गँग हत्या, गोळीबार, जाळपोळ करत असून व्यावसायिक, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती आणि नेत्यांना धमकावून दहशत पसरवते. यामुळे भारतीय समुदायामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे देखील त्यांनी पुढे बोलताना सांगितले.

दुसरीकडे, या निर्णयामुळे आता पोलिसांना गँगच्या सदस्यांवर विविध गुन्ह्यांमध्ये, विशेषत: दहशतवादी कारवायांसाठी निधी (Funding) पुरवण्याशी संबंधित गुन्ह्यांमध्ये, शिक्षा करण्यासाठी अधिक बळ मिळाले आहे. कॅनडाच्या कायद्यानुसार, सूचीबद्ध दहशतवादी गटाला जाणीवपूर्वक पैसे किंवा मालमत्ता देणे किंवा त्यांच्या मालमत्तेशी कोणताही व्यवहार करणे, हा गंभीर गुन्हा ठरतो. कॅनडाच्या या निर्णायक कारवाईमुळे बिश्नोई गँगच्या आंतरराष्ट्रीय कारवायांवर आणि त्यांच्या आर्थिक स्त्रोतांवर मोठा आघात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com