'मला माझा जिवंत समाज हवायं': पंतप्रधान इम्रान खान

इम्रान खान (Imran Khan) यांनी मतदानाच्या एक दिवस आधी रस्त्यावर उतरुन आपला निषेध व्यक्त करण्याचे आवाहन पाकिस्तानी जनतेला केले आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणाऱ्या इम्रान खान यांनी मतदानाच्या एक दिवस आधी रस्त्यावर उतरुन आपला निषेध व्यक्त करण्याचे आवाहन पाकिस्तानी जनतेला केले आहे. देशातील जनतेला उद्देशून बोलताना इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, ''मी त्यांच्याशी कशी स्पर्धा करतो ते उद्या तुम्हाला दिसेल. मला तुम्हाला एकच सांगायचे आहे की, तुम्ही याला विरोध करा. मला माझा समाज जिवंत हवा आहे. दुसरा कोणी जिवंत देश असता आणि त्यात हे घडत असते तर समाज रस्त्यावर उतरला असता.''

इम्रान खान म्हणाले, ''तुम्ही आज आणि उद्या रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे अशी माझी इच्छा आहे. कोणताही पक्ष तुम्हाला बाहेर पडण्यास रोखू शकत नाही. आपल्या देशासाठी, आपल्या मुलांसाठी बाहेर या. या राजकीय चोरांना पुन्हा एकदा सत्तेत यायचे आहे, जेणेकरुन त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे संपुष्टात येतील. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. फक्त आणि फक्त हे लोक देशाचा विश्वासघात करत आहेत. म्हणूनच तुम्ही बाहेर येऊन सांगावे की तुम्ही एक जिवंत समाज आहात.''

Imran Khan
इम्रान खान जाणार अविश्वास ठरावाला सामोरे

दरम्यान, इम्रान खान यांच्या या आवाहनानंतर विशेषत: उद्या इस्लामाबादमध्ये (Islamabad) तणाव आणि हिंसाचाराची शक्यता वाढली आहे. इम्रान खान यांनी शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आवाहन केले असले तरी, पाकिस्तानमध्ये (Pakistan) ज्या प्रकारची राजकीय अस्थिरता त्यातून इम्रान खान सत्तेतून जाणार हे नक्की मानलं जात आहे. इम्रान यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उद्या शांतता राखतील, असे पाकिस्तानमधील राजकीय तज्ज्ञांकडून सूचित करण्यात येत आहे.

Imran Khan
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; पाकिस्तानचा पंतप्रधान कोण होणार?

तसेच, 28 मार्च रोजी पाकिस्तान नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. यावर आता उद्या मतदान होणार आहे. इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्याचा विरोधकांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी 342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये 172 मतांची गरज आहे. तथापि, विरोधकांनी आपल्या बाजूने 175 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com