Bangkok School Shooting: आधी आजी-आजोबांची हत्या केली, नंतर शाळेत अंदाधुंद फायरिंग; आठवीच्या विद्यार्थ्यानं घेतला 3 शिक्षकांसह 8 जणांचा जीव

Thailand School Gun Violence Incident Updates: थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक अंदाधुंद गोळीबार केला.
Thailand School Gun Violence Incident Updates
Bangkok School ShootingDainik Gomantak
Published on
Updated on

Thailand School Gun Violence Incident Updates: थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात तीन शिक्षकांसह आठ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी आता या घटनेबाबत एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला असून, या किशोरवयीन शूटरने शाळेत हल्ला करण्यापूर्वी आपल्या राहत्या घरी जाऊन स्वतःच्या आजी-आजोबांचीही गोळ्या झाडून हत्या केली होती.

या संपूर्ण रक्तरंजित सत्रानंतर, आरोपी विद्यार्थ्याने स्वतःवरही गोळी झाडून घेत आपली जीवनयात्रा संपवली. पोलीस सध्या या दोन्ही हल्ल्यांमागील मुख्य कारणाचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी निघाला, परंतु त्यापूर्वी त्याने घरातच आजी-आजोबांना संपवले. त्यानंतर तो शाळेत पोहोचला आणि त्याने तिथे उपस्थित असलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोळीबारासाठी वापरण्यात आलेली बंदूक या विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबातीलच एका सदस्याकडून घेतली असावी असा संशय आहे.

Thailand School Gun Violence Incident Updates
Bangkok School Shooting: शाळेत अंदाधुंद गोळीबार; विद्यार्थ्यानं शिक्षकाची हत्या करून स्वतःवरही झाडली गोळी, 15 विद्यार्थी जखमी VIDEO

या गोळीबारामुळे संपूर्ण शाळा परिसरात एकच खळबळ उडाली आणि जिवाच्या आकांताने विद्यार्थी सैरावैरा धावू लागले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. शाळेच्या बाहेर शिक्षकांना एकमेकांना मिठी मारुन रडताना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. शाळेतील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने (Student) सांगितले की, सुरुवातीला त्याला फटाके फुटल्याचा भास झाला होता, परंतु लागोपाठ झालेल्या आवाजांनंतर तिथे भयानक शांतता पसरली आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Thailand School Gun Violence Incident Updates
Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

आपत्कालीन सेवा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक मृत आणि जखमी झालेल्यांच्या पाठीवर, छातीवर आणि हातावर गोळ्या लागल्या होत्या. थायलंडचे शिक्षण मंत्री प्रासेर्ट जंतारारुआंगटोंग यांनी या हल्ल्यात शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचाही मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. बचाव पथकाचे कर्मचारी कियातिखुन वेरापोंगप्रादिथ यांनी सांगितले की, त्यांची टीम जेव्हा शाळेत पोहोचली तेव्हा गोळीबार सुरुच होता.

Thailand School Gun Violence Incident Updates
Thailand Mass Shooting: संपूर्ण जगाला हादरवून सोडणारे आतापर्यंतचे 5 मोठे शूटआउट

त्यांना शाळेच्या वरच्या मजल्यावर एक पुरुष शिक्षक मृत अवस्थेत आढळला, तर दुसऱ्या खोलीत एक महिला शिक्षिका गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, ज्यांच्या छातीवर आणि हातावर गोळ्या लागल्या होत्या. या संपूर्ण घटनेत एकूण 15 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने थायलंडमधील शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com