घरात एकत्र जेवणावरही बंदी; कोरानामुळे कुठे लागू झाला नियम?

थायलंडमध्ये (Thailand) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता बॅंकॉकमध्ये (Bangkok) घरातसुध्दा जास्त लोक एकत्र मिळून जेवण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
house
houseDainik Gomantak
Published on
Updated on

बॅंकॉंक: थायलंडमध्ये (Thailand) कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता बॅंकॉकमध्ये (Bangkok) घरातसुध्दा जास्त लोक एकत्र मिळून जेवण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वीसहून अधिक नागरिकांनी एकत्र येवू नये यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच देशात बांधकाम सुरु असलेली ठिकणे बंद करण्यास सांगण्यात आले असून बॅंकॉंक आणि इतर नऊ प्रांतामध्ये कामगारांच्या वसाहती बंद केल्या आहेत. हे निर्बंध तीस दिवस लागू राहणार आहेत.

3995 कोरोना रुग्ण थायलंडमध्ये सापडले असून 24 तासामध्ये 42 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. अलीकडेच कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली. तसेच स्थलांतरित कामगारांच्या वसाहतीसुध्दा बंद करण्यात आल्या असल्याचे कोरोना परिस्थिती हाताळणाऱ्या केंद्राचे प्रवक्ते अपिसामाई श्रीरंग्सन (Apisamai Srirangson) यांनी म्हटले आहे. सांकुत साखो प्रांतामध्ये (Sankut Sakho) कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत आहेत. हे ठिकाण बॅंकॉक शहराच्या दक्षिणेला आहे. राजधानी क्षेत्रामध्ये त्याचा समावेश होत नाही. गंभीर कोरोना रुग्णांना ठेवण्यासाठी बॅंकॉकमध्ये अपुऱ्या पडत असून काही तात्पुरती रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. (Ban on eating together at home; Where did the Koran rule?)

house
UAE: भारतामधून येणाऱ्या विमानांना सूट; अन्य देशांवर निर्बंध कायम

थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चॅन ओचा (Prayuth Chan Ocha) यांनी म्हटले की, बॅंकॉंकमध्ये सात दिवसांची संचारबंदी (Curfew) लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली नाही. नव्या निर्बांधानुसार स्थलांतरित बांधकाम कामगारांना वेगले काढण्यात येणार आहे. ही कारवाई बॅंकॉकसह इतर पाच प्रांतामध्ये ही कारवाई करण्यात येणार असून दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण जास्त असल्याने तेथे ही कारवाई करण्यात येणार आहे. राजधानी बॅंकॉंकमध्ये सर्व व्यवहार सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. मद्य विक्रीही सुरु राहणार आहे असून त्यासाठी केवळ पार्सल सेवा देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com