Baba Vanga Predictions: "वाढतं तापमान अन् मृत्यूची भीती!" 2026 साठी बाबा वेंगाचं धडकी भरवणारं भाकित; प्यायच्या पाण्यासाठी माजणार हाहाकार

Extreme Heatwave 2026 Prediction: बुल्गेरियाच्या जगप्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांनी वर्तवलेली भाकिते जगभरात नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरतात.
Baba Vanga Predictions
Baba VangaDainik Gomantak
Published on
Updated on

Extreme Heatwave 2026 Prediction: बुल्गेरियाच्या जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी वर्तवलेली भाकिते जगभरात नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरतात. आता 2026 वर्षासाठी त्यांनी वर्तवलेली एक भविष्यवाणी भारत आणि जगातील इतर देशांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2026 मध्ये जगभरात प्रचंड उष्णता हाहाकार माजवेल. सूर्याची प्रखर धग आणि उष्ण वाऱ्यांमुळे (लू) मानवी जीवन विस्कळीत होईल.

अंगाची लाहीलाही करणारी ही उष्णता इतकी भीषण असेल की, एसी आणि कुलरदेखील त्यासमोर फिके पडतील. केवळ उष्णताच नाही, तर या काळात भीषण दुष्काळ आणि जलसंकटाचाही सामना करावा लागेल, असा इशारा त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच देऊन ठेवला.

Baba Vanga Predictions
Baba Venga: भूकंपापासून ते पुतिनच्या हत्येपर्यंत... बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी होणार का?

सध्याची परिस्थिती पाहता बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी सत्याच्या जवळ जाताना दिसत आहे. चालू वर्षात एप्रिल महिन्यातच दिल्लीसह भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पार गेला. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. बाबा वेंगा यांनी त्यांच्या भाकितात स्पष्टपणे नमूद केले होते की, हवामान बदलामुळे पृथ्वीचे (Earth) तापमान कमालीच्या वेगाने वाढेल आणि निसर्गाचे संतुलन बिघडेल. 2026 मध्ये मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, ज्यामुळे शेतीवर मोठा परिणाम होऊन अन्नसाखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे केवळ तहानच व्याकुळ करणार नाही, तर वाढत्या तापमानामुळे जंगलात वणवा लागणे आणि पिके जळणे अशा समस्यांनाही तोंड द्यावे लागेल.

Baba Vanga Predictions
Baba Venga: बाबा वेंगा यांची भविष्यवाणी ठरली खरी, काही तासांत...

जगभरातील हवामान तज्ज्ञांच्या मते, बाबा वेंगा यांची भाकिते ही केवळ चिन्हे आहेत, ज्यावरुन आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे. अंटार्क्टिकातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत, जे ग्लोबल वार्मिंगचे सर्वात मोठे उदाहरण आहे. जर जागतिक तापमान वाढीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर उष्णतेची ही लाट केवळ त्रासदायक नाही, तर जीवघेणी ठरु शकते. बाबा वेंगा यांनी 2026 साठी दिलेला इशारा हा मानवाला निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करुन देणारा आहे. येणाऱ्या काळात वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी वृक्षारोपण करणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com