पाकिस्तानच दहशतवादाने जळतंय,एकाच महिन्यात 35 अतिरेकी हल्ले

ऑक्टोबर महिन्यात देशात 35 हून अधिक हल्ले झाले आहेत आणि त्यात किमान 52 नागरिक मारले गेले आहेत.
Attack on Police Team in Khyber Pakhtunkhwa Pakistan
Attack on Police Team in Khyber Pakhtunkhwa PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानच्या (Pakistan) वायव्य भागात मंगळवारी रात्री अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले आहेत(Terrorist Attack on Khyber Pakhtunkhwa) . एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली असून अफगाणिस्तानच्या(Afghanistan) सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा (Khyber Pakhtunkhwa) प्रांतातील लक्की मारवत या शहरात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. पोलिस अधिकारी उमर खान यांनी सांगितले की, अजूनही आरोपींचा शोध सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी या हल्ल्याबाबत कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही नसून बुधवारी सकाळी शहीद अधिकाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचं त्यांनी संगीतले आहे. अलिकडच्या वर्षांत पाकिस्तानमध्ये असे अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत, ज्यापैकी बहुतेकांची जबाबदारी पाकिस्तानी तालिबान आणि इस्लामिक स्टेट (IS) गटाने घेतली आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून हे हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीवर पाकिस्तानी तालिबानचे दहशतवादी असल्याचा पाकिस्तानचा समज आहे.

पाकिस्तान नेहमीच अफगाण तालिबानला पाठिंबा देत आला आहे. पण तो पाकिस्तानी तालिबान म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या विरोधात आहे. तालिबान राजवट परत येताच अनेक TTP लोकांना अफगाणिस्तानातील तुरुंगातून सोडण्यात आले आहे. तेव्हापासून पाकिस्तानला स्वत:च्या क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणा सांभाळणे फार कठीण झाले आहे. या संदर्भात त्यांनी अफगाण तालिबानची मदतही मागितली होती पण काहीही होऊ शकले नाही. टीटीपी पाकिस्तानवर सातत्याने एकापेक्षा जास्त हल्ले करतच आहे.

Attack on Police Team in Khyber Pakhtunkhwa Pakistan
'कंगाल' पाकिस्तानच्या मदतीला सौदी अरेबिया; 3 अब्ज डॉलर्सची केली आर्थिक मदत

पाकिस्तानात सतत होत असलेल्या हल्ल्याबाबत एका अहवालात सांगण्यात आले आहे की, तालिबानने सत्ता हाती घेतल्यापासून पाकिस्तानमध्ये 35 हून अधिक दहशतवादी हल्ले झाले आहेत. पाकिस्तानातील अतिरेकी संघटनांमुळे पाकिस्तानच्या व्यापार आणि गुंतवणुकीचेही नुकसान होत आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टल च्या डेटानुसार,ऑक्टोबर महिन्यात देशात 35 हून अधिक हल्ले झाले आहेत आणि त्यात किमान 52 नागरिक मारले गेले आहेत. ही संख्या फेब्रुवारी 2017 नंतरची सर्वात मोठी आहे. यातील बहुतांश हल्ले टीएलपीनेच केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com