Dnipro लष्करी तळावर हल्ला; 12 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी

रशिया-युक्रेन युद्धाला 94 दिवस उलटून गेले आहेत पण परिस्थिती जैसे थेच आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

रशिया-युक्रेन युद्धाला 94 दिवस उलटून गेले आहेत पण परिस्थिती जैसे थेच आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) आणखी तीव्र हल्ले करण्यास सुरुवात केलू आहेत. रशियाने शुक्रवारी मध्य युक्रेनच्या डनिप्रो शहरातील लष्करी तळावर हल्ला केला आहे. तर या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Attack on Dnipro military base 12 killed 30 seriously injured)

Russia Ukraine War
नेपाळ: भारतीय दूतावासाने मुस्तांगमधील शाळेच्या सुधारित पायाभूत सुविधांचे केले उद्घाटन

याशिवाय नॅशनल गार्डचे प्रादेशिक प्रमुख ग्रँडी कोरबान यांनी मीडियाला सांगितले आहे की, नॅशनल गार्ड प्रशिक्षण केंद्रावर इस्कंदर क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25-30 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Dnipro वर हल्ला

युद्धाच्या सुरुवातीपासूनच, युक्रेनकडे असलेला Dnipro रशियाच्या हल्ल्यातून बचावला होता. लोक पूर्वेकडील शहरातून पळून जाऊन Dnipro मध्ये आश्रय घेत होते. गव्हर्नर व्हॅलेंटीन रेझनित्शेन्को म्हणाले की या हल्ल्यांमुळे गंभीर नुकसान झाले असून बचाव कर्मचारी कोसळलेल्या इमारतींमधून लोकांचा शोध घेता आहेत.

रशियासमोर युक्रेनियन सैन्य कमकुवत होत आहे

युक्रेनियन अधिकार्‍यांनी शुक्रवारी सांगितले की पूर्व युक्रेनमधील रशियन सैन्याने रेल्वे हब शहर लायमन ताब्यात घेतले आहे आणि सेवेरोडोनेत्स्क शहराच्या बराचश्या भागाला वेढा घातला आहे, तर कीवचे सैन्य एक आठवड्यापासून मॉस्को हल्ल्याचा सामना करत होते.

युक्रेनने सांगितले की, अलीकडच्या काही दिवसांत रशियन सैन्याने दोन प्रमुख आघाड्यांवर आपली ताकद दाखवली आहे. वाढत्या हल्ल्यांनंतरही त्याच्या सैन्याने पूर्व डॉनबासमध्ये संरक्षणात्मक रेषा कायम ठेवल्या.

Russia Ukraine War
पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका; इम्रान खान यांनी सरकारला घेरले

युक्रेनने देखील रशियाच्या अधिक शहरांवर कब्जा केल्याचे मान्य केले

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले की बहुतेक शहरे रशियन सैन्याने काबीज केले, परंतु संरक्षण मंत्रालयाने सांगितले की युक्रेनियन सैन्याने अजूनही रशियन सैन्याला स्लोव्हियान्स्कच्या दिशेने जाण्यापासून रोखले. स्लोव्हियान्स्क हे युक्रेनमधील एक प्रमुख शहर आहे जे नैऋत्येला अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे.

प्रादेशिक गव्हर्नर सेर्ही गैडाई यांनी नोंदवले की रशियन सैन्याने स्वयारोडोनेत्स्कच्या दोन तृतीयांश भागाला वेढा घातला आणि त्यातील 90% इमारती नष्ट करण्यात आले आहेत. स्वयारोडोनेत्स्क हे युक्रेनच्या डॉनबासमधील सर्वात मोठे शहर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com