आमचा दोष नाही, अफगाणिस्तानचं अंतर्गत प्रकरण; पाकिस्तानने तालिबानवरुन झटकले हात

अफगाणिस्तानमधील अपयशासाठी पाकिस्तानला दोष देणे थांबले पाहिजे असे असद माजिद खान (Asad Majid Khan) यांनी म्हटले आहे.
Asad Majid Khan: Pakistan not responsible for Afghanistan Crisis
Asad Majid Khan: Pakistan not responsible for Afghanistan CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान (Pakistan) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) केलेल्या कृत्यांकडे पाठ फिरवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांच्या इतर मंत्र्यांनंतर आता अमेरिकेत (USA) तैनात असलेल्या राजदूतानेही याबाबत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.अफगाणिस्तानमधील अपयशासाठी पाकिस्तानला दोष देणे थांबले पाहिजे असे असद माजिद खान (Asad Majid Khan) यांनी म्हटले आहे. आपल्या एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, या अपयशाला स्वतः अफगाणिस्तान जबाबदार आहे. माजिदने म्हटले की, अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistani Army) कोणत्याही धोरणानुसार घडलेली नाही, तर ती स्वतःची अंतर्गत समस्या आहे. यामुळे अफगाणिस्तानचे माजी सरकार पडले आहे. (Asad Majid Khan: Pakistan not responsible for Afghanistan Crisis )

अमेरिकेचे रिपब्लिकन खासदार मायकल जी वॉल्ट्झ यांच्या एका पत्राला उत्तर देताना पाकिस्तानच्या राजदूताने हे विधान केले आहे ज्यात त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना पाकिस्तानवर निर्बंध लादण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानमुळेच तालिबान अफगाणिस्तानात परतले असा आरोप देखील त्यांनी केला होता.

आपल्या पत्रात त्यांनी इम्रान खान सरकारवर थेट आरोप केला होता की काबूल काबीज करण्यासाठी सरकार आणि लष्कराने तालिबानला पूर्ण मदत केली आहे. त्यामुळे त्याविरोधात कडक निर्बंध लादण्याची गरज आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या आगमनानंतर ही जमीन पाकिस्तानसह दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Asad Majid Khan: Pakistan not responsible for Afghanistan Crisis
अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचा निर्णय योग्यच:जो बायडन

प्रत्युत्तरादाखल माजिदने आपल्या पत्रात लिहिले आहे की, अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. अफगाणिस्तानच्या सैन्यात सुमारे तीन लाख सैनिकांचा समावेश होता तरीही त्यांनी तालिबानला आत्मसमर्पण केले आणि त्याचे खापर पाकिस्तानवर फोडले जात आहे. अफगाणिस्तानच्या अपयशासाठी अमेरिकेनेही स्वतःकडे पाहायला हवे. त्यांच्या मते, अफगाण सैन्याचे ते सैनिक या साठी थेट जबाबदार आहेत, ज्यांनी पैसे घेतले आणि शस्त्रे ठेवली. या व्यतिरिक्त, अफगाणिस्तान सरकार आणि त्यांचे नेते देखील जबाबदार आहेत, ज्यांनी देशाला कठीण परिस्थितीत फेकले आहे.

माजिदने आपल्या पत्रात लिहिले आहे की, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या भल्यासाठी अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र यांच्याशी जवळून काम करत आहे. अफगाणिस्तानवर राजकीय तोडगा काढण्याचाही तो प्रयत्न करत आहे.अफगाणिस्तानला कोणत्याही प्रकारे दहशतवाद्यांचा गड बनू देऊ नये या मुद्द्यावर आपल्या दोघांची तत्त्वे समान आहेत. पाकिस्तान सरकार नेहमीच अफगाणांच्या हितासाठी काम करत आले आहे. पाकिस्तानने दोन्ही बाजूंकडून युद्धबंदीचे वारंवार आवाहन केले होते, परंतु दोघांनीही पाकिस्तानकडे दुर्लक्ष केले आणि या सल्ल्याकडे लक्ष दिले नाही हे दुर्दैवी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com