Elon Musk: ट्विटरने गिळंकृत केली मस्क यांची संपत्ती; टेस्लाचे शेअर्स विकावे लागल्याने संपत्तीत वर्षात 'इतकी' घट

मस्क यांची संपत्ती आली 12.24 लाख कोटींवर, गौतम अदानींच्या संपत्तीत 4.1 लाख कोटींनी वाढ
Elon Musk
Elon MuskDainik Gomantak
Published on
Updated on

Elon Musk: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांची संपत्ती सातत्याने कमी होत आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, मंगळवारी त्यांची एकुण संपत्ती 7.75 बिलियन डॉलर (सुमारे 64 हजार कोटी) ने घटून 148 बिलियन (सुमारे 12.24 लाख कोटी रुपये) वर आली आहे, जी 2 वर्षातील सर्वात कमी आहे. टेस्लाच्या समभागांच्या सततच्या घसरणीमुळे मस्क यांची एकूण संपत्ती घटली आहे. मस्कने ट्विटर टेकओव्हरसाठी टेस्लाचे शेअर्स विकले आहेत. संपत्ती घसरण्याचे हेही कारण आहे.

Elon Musk
Nazi Typist: खुनाच्या 10505 प्रकरणात महिला टायपिस्ट दोषी, अवघ्या दोन वर्षांची सुनावली शिक्षा!

एका आठवड्यापूर्वी, फ्रेंच अब्जाधीश आणि लुई व्हिटॉनचे सीईओ मोएट हेनेसी बर्नार्ड अर्नॉल्ट हे मस्क यांना मागे टाकत सर्वाधिक श्रीमंतांच्या पहिल्या क्रमांकावर पोहोचले. त्यांची एकूण संपत्ती 161 अब्ज डॉलर (सुमारे 13.32 लाख कोटी) आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर भारतीय उद्योगपती गौतम अदानी आहेत. आता मस्क आणि अदानी यांच्या एकूण संपत्तीमध्ये फक्त 21 अब्ज डॉलर (1.73 लाख कोटी) इतकाच फरक आहे. आणखी एक भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी 89.7 अब्ज डॉलर (7.42 लाख कोटी) सह 8 व्या क्रमांकावर आहेत.

एलन मस्कची नेटवर्थ या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारी रोजी 271 बिलियन डॉलर (रु. 22.42 लाख कोटी) होती, जी 148 बिलियन डॉलरवर आली आहे. म्हणजेच, या वर्षी मस्क यांच्या संपत्तीत 123 अब्ज डॉलरची (45.4%) घट झाली आहे.

Elon Musk
Nepal Politics: PM देउबा पुन्हा सज्ज, काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी वर्णी

या वर्षाच्या सुरुवातीला टेस्लाच्या स्टॉकची किंमत 400 डॉलरच्या आसपास होती. आता ती 65.54 टक्क्यांनी घसरून 137.80 डॉलरवर आली आहे. 6 महिन्यांत या स्टॉकच्या मुल्यात सुमारे 41 टक्के घट झाली आहे. मंगळवारी या स्टॉकमध्ये 8 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

दुसरीकडे, गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात 50 अब्ज डॉलर्सची (सुमारे 4.1 लाख कोटी) वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्यांची एकूण संपत्ती 77 बिलियन डॉलर (सुमारे 6.3 लाख कोटी) होती, जी आता 127 बिलियन डॉलर (रु. 10.50 लाख कोटी) झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com