Argentina President Javier Milei: अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी गर्लफ्रेंडला सर्वांसमोर केलं किस, VIDEO व्हायरल

Argentina President Javier Milei: अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष जेवियर माइली सध्या त्यांच्या एक कृतीमुळे चर्चेत आहेत.
Argentina President Javier Milei
Argentina President Javier MileiDainik Gomantak
Published on
Updated on

Argentina President Javier Milei: अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष जेवियर माइली सध्या त्यांच्या एक कृतीमुळे चर्चेत आहेत. दरम्यान, त्याचं चर्चेत असणं ही काही नवीन गोष्ट नसली तरी यावेळी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठावर केलेल्या पराक्रमामुळे ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वास्तविक, माइली यांनी स्टेजवरच त्यांच्या गर्लफ्रेंडला किस केले, जे पाहून उपस्थित लोकही आश्चर्यचकित झाले. याआधीही माइली यांनी आपल्या गर्लफ्रेंडला सार्वजनिकपणे किस केले आहे. नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदासाठीचे मतदान संपले तेव्हाही ते त्याच शैलीत दिसले होते.

अध्यक्ष माइली यांची गर्लफ्रेंड कोण आहे?

अध्यक्ष माइली यांची गर्लफ्रेंड फातिमा एक कॉमेडियन आहे. ती तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली आहे. सध्या ती अध्यक्ष माइली यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांची प्रेमकहाणी इंस्टाग्रामवरुन सुरु झाली.

Argentina President Javier Milei
Argentina New President: 'बलात्कारानंतरही अबॉर्शन करणे पाप,' जाणून घ्या कोण आहेत अर्जेंटीनाचे नवे राष्ट्रपती

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अध्यक्ष माइली शुक्रवारी त्यांची गर्लफ्रेंड फातिमा फ्लोरेजसह नवीन कॉन्सर्टमध्ये पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान अध्यक्षांनी आपल्या गर्लफ्रेंडला स्मोच केले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माइली यांनी पहिल्यांदा स्टेजवर भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी उपस्थितांना सांगितले की ''अर्जेंटिनासाठी कठीण काळ आहे, परंतु या कठीण काळात हिम्मत न हारता आपल्याला पुढे जायचे आहे.'' यानंतर त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला सर्वांसमोर किस केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com