Apple CEO Tim Cook
Apple CEO Tim CookDainik Gomantak

Apple चे CEO टीम कुक यांच्या पगारात मोठी कपात, जाणून घ्या यंदा किती मिळणार पगार?

Apple CEO Tim Cook: ॲपल हा जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड आपल्या मोबाईल फोन तंत्रज्ञानामुळे अनेकदा चर्चेत असतो.

Salary of Top CEO: ॲपल हा जगातील सर्वात प्रसिद्ध ब्रँड आपल्या मोबाईल फोन तंत्रज्ञानामुळे अनेकदा चर्चेत असतो. ॲपलने पुन्हा एकदा मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. Apple Inc. (Apple) ने आपले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टिम कुक यांच्या पगारात 40 टक्क्यांहून अधिक घट करुन यावर्षी 49 दशलक्ष डॉलर्स करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्लूमबर्गच्या मते, या बदलांमध्ये कुक यांना दिलेल्या स्टॉक युनिट्सची टक्केवारी आणि Apple च्या कामगिरीशी जोडलेली टक्केवारी समाविष्ट आहे, जी 2023 मध्ये 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत वाढेल.

Apple CEO Tim Cook
Amazon Lay Off: Twitter, Meta अन् Microsoft नंतर Amazon मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांची कपात, 'हे' आहे मोठं कारण

दुसरीकडे, कुक यांना यावर्षी पगार म्हणून US $ 49 दशलक्ष (रु. 3,98,75,71,000) मिळतील. त्यांनी 2022 मध्ये US $ 99.4 दशलक्ष कमावले, ज्यामध्ये US $ 3 दशलक्ष त्यांच्या मुख्य पगाराचा आणि US $ 83 दशलक्ष स्टॉकचा समावेश आहे. शिवाय, त्यासोबत एक बोनसही जोडलेला आहे. तसेच, 2021 वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, टीम कुक यांचे एकूण पॅकेज US $ 98.7 दशलक्ष होते.

सुंदर पिचाई आणि इतर सीईओ इतके काम करतात?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार सुमारे 242 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 1880 कोटी रुपये आहे. दुसरीकडे, जर आपण मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला बद्दल बोललो, तर 2022 मध्ये त्यांची एकूण कंपंसेशन $54.9 दशलक्ष होते.

Apple CEO Tim Cook
Amazon Layoff: ट्विटर, फेसबुकनंतर आता अ‍ॅमेझॉनचा नंबर; 3500 कर्मचाऱ्यांना घरी घालवल्याची चर्चा

बिझनेसइनसाइडरच्या अहवालानुसार, 2021 मध्ये प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी Amazon च्या CEO ची एकूण कंपंसेशन $212,701,169 होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या जागी ॲंडी जॅसी यांना कंपनीचे नवे सीईओ बनवण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com