अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी (Taliban) आपली सत्ता स्थापन केली. तालिबान्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी पाकिस्तानने मदत केल्याचा आरोप इम्रान खान सरकारवर (Imran Khan Government) सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन करण्यात आला. तर दुसरीकडे चीन तालिबानशी लागेबंध स्थापन करत अफगाणिस्तानमधील खनिजसंपत्तीवर डोळा ठेवून आहे. या सर्व पाश्वभूमीवर तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात गंभीर मानवतावादी संकटाचा (Humanitarian Crisis) सामना करत असलेल्या अफगाण नागरिकांना मदत करण्यासाठी अमेरिकेने $144 दशलक्ष मदत देणार आहे. युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजीज (UNHCR), युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF), इंटरनॅशनल द ऑर्गनायझेशन यासह स्वतंत्र आंतरराष्ट्रीय आणि गैर-सरकारी मानवतावादी संस्थांना थेट मदत पुरवण्यात येणार असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन (Antony Blinken) यांनी गुरुवारी सांगितले. इमिग्रेशन (IOM) आणि जागतिक आरोग्य संघटनांचाही यामध्ये समावेश असणार आहे.
ब्लिंकेन म्हणाले, "हा निधी या प्रदेशातील 18 दशलक्षाहून अधिक गरजू अफगाण लोकांना थेट मदत करेल, ज्यात शेजारील देशांमध्ये आश्रय घेत असलेल्या अफगाण निर्वासितांचा समावेश असणार आहे."
लोकांना फायदा होईल, तालिबानचा नाही
परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले, 'ही मदत आमच्या भागीदारांना आवश्यक जीवन सुरक्षा, अन्न सुरक्षा, अत्यावश्यक आरोग्य सेवा, आरोग्य सेवेच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मानवी गरजा, कोविड-19, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी मदत प्रदान करण्यात येणार आहे. संबंधित सहाय्य आम्हाला इतर लॉजिस्टिक आणि आपत्कालीन अन्न सहाय्य प्रदान करण्यास सक्षम करेल. मात्र वचनबद्धतेसाठी तुम्हाला जबाबदार धरले जाईल, असही ब्लिंकन यांनी तालिबान्यांना उद्देशून म्हटले आहे.
शेजारी देशांसाठी सीमा खुल्या ठेवाव्या
अफगाणिस्तानच्या शेजारी असणाऱ्या देशांनी जगातील सर्वात मोठ्या आणि प्रदीर्घ निर्वासित परिस्थितीचा सामना केला आहे. (Why Did US Support Afghanistan). त्यासाठी ब्लिंकन यांनी या देशांचे आभार मानले, तसेच अफगाण नागरिकांना या शेजारी देशांनी आपल्या सीमा खुल्या ठेवाव्या असं आवाहनही यावेळी ब्लिंकन यांनी केले. तसेच ''या नव्या मानवतावादी मदतीद्वारे, आम्ही अफगाण निर्वासितांना सुरक्षा प्रदान करतो आहोत. तसेच या प्रदेशातील आमच्या भागीदारांना समर्थन देणे सुरु ठेवू," असही ब्लिंकेन म्हणाले. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील गरजूंनाही आम्ही सदैव मदत करत राहू.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.