रशियन कायदा! बलात्कारी आरोपीला आर्क्टिकच्या तुरुंगात होणार कठोर शिक्षा

रशियातील कोस्ट्रोमा येथे पाच वर्षांची मुलगी तिच्या आईच्या कामाच्या ठिकाणाजवळ खेळत होती. यादरम्यान आरोपीने मुलीचे अपहरण केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Anti Rape law in Russia

Anti Rape law in Russia

Dainik Gomantak

Published on
Updated on

अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी रशियाने (Russia) कठोर कायदा करण्याची घोषणा केली आहे. या कायद्यानुसार, बलात्कार करणाऱ्या आरोपीला आर्क्टिकच्या थंड आणि निर्जन ठिकाणी बनवलेल्या तुरुंगात या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. रशियन संसद या महिन्यात नवीन लैंगिक अपराध कायद्याला मंजुरी देणार आहे. संसदेने कायदे मंजूर केल्यानंतर त्यावर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladimir Putin) यांची स्वाक्षरी घेतली जाणार आहे.

<div class="paragraphs"><p>Anti Rape law in Russia</p></div>
Omicron Variant: ब्रिटनने प्रवासा संबंधित बदलले नियम

रशियन संसदेच्या अध्यक्षांनी सांगितले की, मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या राक्षसांना आर्क्टिकच्या कडक थंड वसाहतींमध्ये त्यांची शिक्षा भोगावी लागेल. इतकेच नाही तर तेथील सायबेरियन खाणींमध्ये काम मिळवण्यासाठीही गुन्हेगारांचा वापर होऊ शकतो. पुतिन प्रशासनावर रशियातील बाल बलात्काराचे (Anti Rape law ) कायदे कठोर करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. खरं तर, या आठवड्यात रशियामध्ये पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती.

आईच्या माजी प्रियकराने हा गुन्हा केला

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे तिच्या आईच्या माजी प्रियकराने त्याच्या एका साथीदारासह अपहरण केले होते. मुलीचे अपहरण केल्यानंतर गुन्हेगारांनी ही वेदनादायक घटना घडवून आणली आणि नंतर तिची हत्या केली. या घटनेबाबत संपूर्ण रशियात निदर्शने होत आहेत. अशा गुन्हेगारांवर सरकारने कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी जनतेची मागणी आहे. रिपोर्टनुसार, पाच वर्षांची मुलगी रशियातील कोस्ट्रोमा येथे तिच्या आईच्या कामाच्या ठिकाणाजवळ खेळत होती.

<div class="paragraphs"><p>Anti Rape law in Russia</p></div>
WHO Omicron Variant Severity: हलक्यात घेऊ नका, जगभरातील लोक मरत आहेत

दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली

आरोपीने मुलीचे अपहरण केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आजूबाजूला उभ्या असलेल्या जमावाने मुलीला वाचवण्याचा प्रयत्नही केला नसल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. पिशवीत बंद अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला अटक केली. दोन्ही आरोपींनी मुलीवर बलात्कार केल्यानंतर खुनाचा गुन्हा कबूल केला आहे. व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय असलेले संसदीय सभापती व्याचेस्लाव वोलोडिन यांनी सांगितले की, मुलीवर होणारे बलात्कार आणि हत्या हा गंभीर गुन्हा आहे. यावरून आपल्याला कायदे अधिक कडक करण्याची गरज असल्याचे दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com