VIDEO: क्षणभराची चूक अन् आयुष्य उद्ध्वस्त! सेल्फीच्या मोहानं घेतला जीव; धबधब्यातील खडकावरुन पाय घसरुन 3 मैत्रीणींचा मृत्यू

Andhra Pradesh Waterfall Drowning Accident: निसर्गरम्य धबधबे आणि सहलीच्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली.
Andhra Pradesh Waterfall Drowning Accident
Andhra Pradesh Waterfall Drowning AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Andhra Pradesh Waterfall Drowning Accident: निसर्गरम्य धबधबे आणि सहलीच्या ठिकाणांसाठी प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. गुरुवारी मुल्लुंगुम्मी धबधब्यावर सहलीसाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. केवळ एक 'परफेक्ट' फोटो आणि सेल्फी घेण्याच्या नादात या मुलींनी आपला जीव गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुकुमपेटा मंडळातील बुर्जा पंचायतीजवळ असलेल्या मुल्लुंगुम्मी धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी मुलींचा एक ग्रुप गेला होता. या निसर्गरम्य वातावरणात फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. अधिक चांगल्या अँगलने फोटो आणि सेल्फी घेता यावा यासाठी तीन मुली पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या खडकावर चढल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि खडकावरील शेवाळामुळे त्यांचा पाय घसरला आणि त्या तिघीही पडल्या. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.

Andhra Pradesh Waterfall Drowning Accident
Andhra Pradesh Crime: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, ट्यूशनला जात असताना...

धबधब्याच्या परिसरात उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा ऐकून तातडीने मुलींना वाचवण्यासाठी धाव घेतली. काहींनी पाण्यात उड्या मारुन त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु पाण्याचा जोरदार प्रवाह मुलींना दूरवर ओढून घेऊन गेला. काही वेळानंतर शोध घेतला असता, या तिन्ही मुलींचे मृतदेह हाती लागले. या घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन मुली सुदैवाने सुरक्षित वाचल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Andhra Pradesh Waterfall Drowning Accident
Andhra Pradesh: हिंदू धर्माचे संरक्षण आणि प्रचारासाठी दक्षिणेतील 'या' राज्याचा मोठा निर्णय, बांधणार तब्बल 3000 मंदिरे

या दुःखद घटनेने अल्लूरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. हे ठिकाण आपल्या मनमोहक दृश्यांसाठी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, परंतु यापूर्वीही येथे अशाच प्रकारे पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून अनेकदा धोकादायक ठिकाणी न जाण्याच्या सूचना आणि इशारे दिले जातात, मात्र पर्यटक या चेतावणीकडे दुर्लक्ष करतात.

Andhra Pradesh Waterfall Drowning Accident
Andhra Pradesh: चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू

विशेषतः तरुण मुले आणि पर्यटक फोटो, व्हिडिओ किंवा 'रील्स' बनवण्यासाठी जीव धोक्यात घालून खोल पाण्याजवळ किंवा निसरड्या खडकांवर जातात. अशा प्रकारच्या बेपर्वाईमुळे पर्यटनाचा आनंद एका क्षणात शोकात बदलतो, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले. पोलीस (Police) प्रशासनाने आता या परिसरात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याचे संकेत दिले असून पर्यटकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com