US Walmart store Shooting: अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये बेछूट गोळीबार, 10 जणांचा मृत्यू

US Walmart store Shooting: या गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
US Walmart store Shooting:
US Walmart store Shooting: Dainik Gomantak

US Walmart store Shooting: अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक लोक जखमीही झाले आहेत.

पोलिसांचा दावा

चेसापीक पोलिस विभागाचे म्हणणे आहे की सुमारे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि बरेच लोक जखमी झाले आहेत. पोलीस इमारतीची चौकशी करत आहेत. गोळीबार करणारा मृत झाल्याचा पोलिसांना विश्वास आहे, परंतु लोकांना सध्या इमारतीपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री 10:12 वाजता गोळीबाराची माहिती देणारा कॉल आला. 

वॉलमार्ट स्टोअरच्या बाहेर प्रचंड पोलीस (Police) दल अजूनही तैनात आहे, असे मीडिया आउटलेट WAVY च्या मिशेल वुल्फ यांनी सांगितले. यासोबतच 40 हून अधिक आपत्कालीन वाहनांनाही इमारतीबाहेर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाने स्थानिक लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे.

  • 'व्यवस्थापकाचा कर्मचाऱ्यांवर गोळीबार'

डेलीमेल डॉट कॉमवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनास्थळी उपस्थित लोकांनी गोळीबार करणारा व्यक्ती स्टोअरचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले. व्यवस्थापक ब्रेक रूममध्ये घुसला आणि दुकानातील इतर कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला.

  • अमेरिकेत सामूहिक शूटिंग

अमेरिकेतील सामूहिक गोळीबाराच्या घटना सुरुच आहे. अमेरिकेतील कोणत्या ना कोणत्या शहरातून दररोज सामूहिक गोळीबाराच्या बातम्या येत असतात. फक्त दोन दिवसांपूर्वी, कोलोरॅडो स्प्रिंग्समध्ये एका गे नाईट क्लबमध्ये एका बंदुकधारीने गोळीबार केला, ज्यात किमान पाच लोक ठार आणि 18 जखमी झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com