America Strikes Iranian Oil Tankers: युद्धनौकेवरील क्षेपणास्त्र हल्ल्याचा चोख बदला! अमेरिकेने उडवले इराणचे 5 महाकाय तेल टँकर्स; रिव्होल्यूशनरी गार्डचा गेम ओव्हर? VIDEO

US CENTCOM Destroys Iranian Oil Tankers Persian Gulf: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा विकोपाला गेला असून मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे.
America Strikes Iranian Oil Tankers:
America Strikes Iranian Oil Tankers:Dainik Gomantak
Published on
Updated on

America Strikes Iranian Oil Tankers: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा विकोपाला गेला असून मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सकडून अमेरिकेच्या नौदल युद्धनौकेवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी दोन वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्याला अत्यंत कठोर प्रत्युत्तर देत अमेरिकन सेंट्रल कमांडने कारवाई करत इराणच्या 5 महाकाय कच्चे तेल वाहून नेणाऱ्या टँकर्सना थेट लक्ष्य करुन उद्ध्वस्त केले. अमेरिकेच्या या अनपेक्षित आणि धडक कारवाईमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे.

अमेरिकेने दिलेल्या माहितीनुसार, इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकन युद्धनौकेचे कोणतेही नुकसान झाले नाही आणि सैनिकांना कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु, इराणच्या या नापाक इराद्यांना चोख उत्तर देण्यासाठी अमेरिकेने इराणी अर्थव्यवस्थेची मुख्य नस असलेल्या तेल टँकर्सवरच थेट प्रहार केला. इराणच्या अधिकृत वृत्तवाहिनीनेदेखील या घटनेची पुष्टी केली असून, जास्क बंदर आणि पारसच्या खाडीतील खार्ग बेटाजवळ इराणी टँकर्सवर हल्ले झाल्याचे मान्य केले. सुदैवाने या टँकर्सवरील कर्मचाऱ्यांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

America Strikes Iranian Oil Tankers:
Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कारवाईनंतर इराणला कडक शब्दांत इशारा दिला. अमेरिका (America) आपल्या सैनिकांवरील आणि युद्धनौकांवरील हल्ले कधीही सहन करणार नाही; इराणने जेव्हा जेव्हा अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना स्वतःचे तेल टँकर्स गमवावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डने कुवेत आणि बहारीनच्या बंदरांजवळ असलेल्या तेल टँकर्सना गंभीर चेतावणी दिली. या देशांमध्ये अमेरिकन लष्कराचे तळ असल्याने इराण आता या भागातील सागरी वाहतुकीला लक्ष्य करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.

America Strikes Iranian Oil Tankers:
Iran Oman New Route: ट्रम्प यांचा दावा ठरला फुसका फटाका! इराणनं ओमानसोबत हातमिळवणी करत रचला नवा 'गेम प्लॅन'; अमेरिकन जहाजे होणार जप्त?

अमेरिका आणि इराणमधील या थेट लष्करी संघर्षाचे भयंकर परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर दिसू लागले आहेत. आखाती देशांमधील सागरी मार्ग धोक्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या पार पोहोचले आहेत. जर हा तणाव असाच कायम राहिला, तर जगभरात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होऊन महागाईचा प्रचंड भडका उडण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com