700 महिलांची सेक्स ट्रॅफिकिंग करुन HIV पॉझिटिव्ह बनवण्याचे घृणास्पद कृत्य; 'या' देशातील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

America Crime News: या आरोपीचे नाव जेसन रॉजर पोप आहे, ज्याला डीजे किड म्हणूनही ओळखले जाते.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

America Crime News: अमेरिकेतून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पहिल्यांदा शेकडो मुलींशी संबंध ठेवले आणि 700 कृष्णवर्णीय महिलांना सेक्स ट्रॅफिकिंगच्या दलदलीत ढकलले. मात्र, आरोपीने हे मान्य केले नाही. विशेष म्हणजे, काही मुलींना त्याने एचआयव्ही पॉझिटिव्हही बनवले.

दरम्यान, या आरोपीचे नाव जेसन रॉजर पोप आहे, ज्याला डीजे किड म्हणूनही ओळखले जाते. अटलांटा ब्लॅक स्टारच्या रिपोर्टमध्ये या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला आहे. 2017 ते 2019 या कालावधीत अल्पवयीन मुलींची तस्करी केल्याप्रकरणी त्याच्यावर न्यायालयात आरोप ठेवण्यात आले होते. पोपने जाणीवपूर्वक पीडितांना एचआयव्हीची लागण केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले होते.

Crime News
America Crime: अमेरिकेत पुन्हा एका भारतीयाचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईवर उठले प्रश्न; पहिल्या पत्नीने सांगितले...

सेक्स ट्रॅफिकिंगकरणी 30 वर्षांची शिक्षा

न्यायालयाने पोपला सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणी 30 वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय, तुरुंगातून सुटल्यानंतर त्याला पाच वर्षे रिहॅब सेंटरमध्ये राहावे लागेल, जिथे त्याच्यावर विशेष एजंट्सद्वारे देखरेख केली जाईल. आरोपीच्या शिक्षेवर, दक्षिण कॅरोलिना ऍटर्नी जनरल कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अनेक पीडितांनी साक्ष्य देताना आपली आपबिती न्यायालयात सांगितली. पोप सध्या तुरुंगात असल्याने त्याला आता दिलासा मिळाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com