एलन मस्कचे बेताल विधान! लोकांना नाटक कमी हवे होते, म्हणून ट्रम्प विरोधात जिंकले जो बायडेन

मस्क यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची खिल्ली उडवत ट्रम्प यांना दिले ट्विटरची ऑफर
America President Joe Biden Elon musk Donald trump twitter war
America President Joe Biden Elon musk Donald trump twitter war Dainik Gomantak
Published on
Updated on

वॉशिंग्टन: जगातील सर्वात श्रीमंत आणि अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला मोटर्सचे मालक एलन मस्क ट्विटरवर (Twitter) सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. त्याचे ट्विटही चांगलेच गाजत आहेत. यावेळी मस्क (Elon Msuk) यांनी अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्याबद्दल ट्विट केले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, 'लोकांना कमी नाटक हवे होते म्हणून बायडेन यांची अध्यक्षपदी निवड झाली.' (America President Joe Biden Elon musk Donald trump twitter war)

एलन मस्क यांनी ट्विट केले की, 'जो बायडेन अमेरिकेला बदलण्यासाठी निवडले गेले असे समजणे चुकीचे आहे. लोकांना कमी नाटक हवे होते म्हणून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अध्यक्षीय निवडणूक जिंकली.'

याआधी मस्क यांनी, 'जरी मला वाटतं की 2024 मध्ये कमी फूट पाडणारा उमेदवार चांगला असेल, तरीही मला वाटतं ट्रम्प यांनी ट्विटरवर पुनरागमन केले पाहिजे.' असे ट्विट करत ट्रप्म यांना ट्विटरवर आमंत्रित केले आहे.

मस्क ट्रम्प यांचे समर्थन करत आहेत

अलीकडेच ट्विटर विकत घेतलेल्या एलन मस्कनेही ट्रम्पचे ट्विटर हँडल ब्लॉक करणे चुकीचे आहे असे म्हटले आहे. 'मला वाटते की ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट पुन्हा रिस्टोअर केले पाहिजे.' असे वक्तव्य वारंवार एलन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवरील बंदी हटवणार असल्याचे सांगितले होते.

America President Joe Biden Elon musk Donald trump twitter war
ट्विटर डील होल्डवर, एलन मस्कची मोठी घोषणा

ट्रम्प यांच्या ट्विटर हँडलवर बंदी का घालण्यात आली?

अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. यासाठी ट्रम्प समर्थकांना जबाबदार धरण्यात आले. यानंतर ट्विटरसह अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. गेल्या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी दोन ट्विट केले होते. एकात, त्यांनी हिंसाचाराच्या समर्थकांना क्रांतिकारक म्हणून संबोधले होते आणि दुसर्‍यामध्ये 20 जानेवारी रोजी राष्ट्रपती पदाच्या उद्घाटनाला (बायडेन यांच्या शपथविधीला) जाणार नाहीत, असे म्हटले होते. या दोन ट्विटनंतर काही मिनिटांत ट्रम्प यांच्या अकाऊंटवरील ट्विट दिसणे बंद झाले आणि अकाऊंट सस्पेंड झाल्याचा संदेश दिसू आला.

America President Joe Biden Elon musk Donald trump twitter war
ट्रम्प परतणार ट्विटरवर, सोशल मीडियावर आला मीम्सचा महापूर

ट्रम्प सध्या कोणते सोशल प्लॅटफॉर्म वापरत आहेत?

ट्विटरवर बंदी घातल्यानंतर ट्रम्प ट्रुथ सोशलचा वापर करत आहेत. ट्रुथ सोशल ची मालकी ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुपची आहे. डिजिटल वर्ल्ड ऍक्विझिशन कॉर्पोरेशनमध्ये विलीन करून ती सूचीबद्ध कंपनीमध्ये रूपांतरित झाली आहे. Truth Social हे अॅपलच्या अॅप स्टोअरवर प्री-ऑर्डरसाठी आधीच उपलब्ध आहे. अॅपची बीटा आवृत्ती पुढील महिन्यात लॉन्च होईल. ट्रम्प व्हिडिओ-ऑन-डिमांड स्ट्रीमिंग सेवा देखील सुरू करणार आहेत. मात्र, एलन मस्कचे ट्विटर खरेदी केल्यानंतर अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांच्या खात्यावरील बंदी हटवण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com