पुन्हा एकदा अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझॉस बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Amazon chief Jeff Bezos became the richest man in the world Once again
Amazon chief Jeff Bezos became the richest man in the world Once again
Published on
Updated on

वी दिल्ली : अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले  जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांना मागे टाकत बेझोसने हे स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार जेफ बेझोस यांची एकूण मालमत्ता सुमारे 14.10 लाख कोटी आहे.

बोझॉस यांची एकूण संपत्ती 19100 करोड़ डॉलर

जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती सुमारे 19100 करोड़ डॉलर म्हणजेच 14.10 लाख कोटी आहे. मागील तीन वर्षांहून अधिक काळ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, परंतु जानेवारी 2021 मध्ये, एलॉन मस्क हे मागे टाकत सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. परंतु आता, बेझॉस यांची मालमत्ता मस्कपेक्षा 95.5 दशलक्ष डॉलर्स जास्त आहे.

टेस्लाचे शेअर्स पडले

मंगळवारी टेस्लाचे शेअर्स 2.4 टक्क्यांनी घसरून 796.22 डॉलरवर बंद झाले. यामुळे एलॉन मस्कची संपत्ती 4.58 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. 2021 मध्ये टेस्लाचे मालक एलॉन मस्कची संपत्ती आत्तापर्यंत 2050 दशलक्ष डॉलरने वाढली आहे, तर जेफ बेझोसची संपत्ती फक्त 88.40 मिलियन डॉलरने वाढली आहे. गेल्या 24 तासांत एलॉन मस्कची संपत्ती 458 दशलक्ष डॉलर्सने घटली. 26 जानेवारीपासून टेस्लाच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

बिल गेट्स तिसऱ्या स्थानावर

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या अब्जाधीशांच्या यादीत  137 अरब डॉलरसह  बिल गेट्स तृतीय, तर 116 अरब डॉलर्सच्या संपत्तीसह बर्नार्ड अर्नाल्ट चौथ्या स्थानावर आहे, तर मार्क झुकेरबर्ग (104 अरब डॉलर) पाचव्या स्थानावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com