SIPRI Report: शस्त्र खरेदीचे सर्व रेकॉर्ड मोडले, अमेरिका आघाडीवर; जाणून घ्या भारताचा नंबर?

Defence Expenditure: SIPRI च्या रिपोर्टनुसार, 2023 मध्ये जागतिक लष्करी खर्चाने नवा विक्रम केला आहे. 2023 मध्ये लष्करी खर्च 2022 च्या तुलनेत 6.8 टक्क्यांनी वाढून 24.4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला.
military
militarydainikgomantak
Published on
Updated on

The 10 largest Military Expenditure: जगाची वाटचाल महायुद्धाकडे होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, सध्या जगभरातील सैन्य आणि शस्त्रांवर जेवढा खर्च केला जात आहे, तेवढा कधीच झाला नव्हता. स्वीडनची स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) चा रिपोर्ट समोर आला आहे. जगातील देश सध्या जेवढा पैसा प्राणघातक शस्त्रे, दारुगोळा आणि लष्करी उपकरणांवर खर्च करत आहेत, तो यापूर्वी कधीही झाला नव्हता.

SIPRI च्या रिपोर्टनुसार, 2023 मध्ये जागतिक लष्करी खर्चाने नवा विक्रम केला आहे. 2023 मध्ये लष्करी खर्च 2022 च्या तुलनेत 6.8 टक्क्यांनी वाढून 24.4 ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. तर 2022 मध्ये हा खर्च 22.4 ट्रिलियन डॉलर होता. जगाचा वाढता लष्करी खर्च हेही सिद्ध करतो की, जगाला आता कमी सुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे देश मुत्सद्देगिरीऐवजी लष्करी ताकद वाढवण्यावर भर देऊ लागले आहेत.

लष्करी खर्चात भारताची मोठी झेप

दरम्यान, 2023 मध्ये लष्करावर खर्च करणारा भारत जगातील चौथा सर्वात मोठा देश आहे. SIPRI च्या रिपोर्टनुसार, भारताने 2023 मध्ये लष्करावर 83.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च केले. 2022 च्या तुलनेत हे प्रमाण 4.2 टक्क्यांनी अधिक आहे. ताज्या आकडेवारीनुसार, या बाबतीत सर्वाधिक खर्च करणारा देश अमेरिका आहे, त्यानंतर चीन दुसऱ्या स्थानावर आणि रशिया तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताने 4.2 टक्के अधिक खर्च केला आहे. 2022 मध्येही भारत हा लष्करावर खर्च करणारा जगातील चौथा सर्वात मोठा देश होता.

military
Russia Ukraine War: रशियन-नियंत्रित शहरावर बेछूट गोळीबार, 10 जण ठार; ढिगाऱ्याखालून पाच जणांना जिवंत काढले

भारताची लष्करी ताकद

दरम्यान, 2020 मध्ये लडाखमध्ये चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर भारताने संरक्षण क्षेत्रात आपली ताकद वाढवण्यावर भर दिला. देश सध्या लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, युद्धनौका, रणगाडे, तोफखाना, रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि इतर लढाऊ यंत्रणांचे आधुनिकीकरण करुन लष्कराची पुनर्रचना करत आहे.

2022 मध्ये सर्वाधिक खर्च करणारे पाच देश

लष्करी खर्चात अमेरिका (America) अजूनही आघाडीवर आहे. 2023 मध्ये, अमेरिकाने 916 अब्ज डॉलर्स खर्च केला, जो जगाच्या एकूण खर्चाच्या 37 टक्के किंवा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, ज्याचा खर्च अमेरिकेच्या एक तृतीयांश आहे. यात 296 अब्ज डॉलर्स खर्च झाले, जे एकूण खर्चाच्या 12 टक्के आहे. विशेष म्हणजे हा खर्च 2022 च्या तुलनेत 6 टक्के अधिक आहे. या दोन देशांनी एकूण खर्चापैकी निम्मा वाटा उचलला. रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2023 मध्ये रशियाचा खर्च 2022 च्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढून $109 अब्ज झाला. रशियाने 2014 मध्ये क्रिमियाला युक्रेनपासून वेगळे केल्यानंतर हे प्रमाण 57 टक्क्यांनी वाढले आहे. रशिया आपल्या जीडीपीच्या 5.9 टक्के सैन्यावर खर्च करतो.

military
Israel America Relations: ''इस्त्रायली लष्कराच्या युनिटवर बंदी घालणे मूर्खपणाचे अन्...''; बेंजामिन नेतन्याहू बायडन सरकारवर संतापले

2443 अब्ज डॉलर्स खर्च

त्यानंतर भारत (India) आणि सौदी अरेबियाचा क्रमांक लागतो. SIPRI च्या रिपोर्टमध्ये असेही दिसून आले आहे की, 2023 मध्ये जगभरातील देशांनी त्यांच्या संबंधित सैन्यावर 2443 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. 2022 च्या तुलनेत हा खर्च 6.8 टक्क्यांनी वाढला आहे. ही ताजी आकडेवारी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा भारताचा चीनसोबत मागील काही महिन्यांपासून सीमावाद सुरु आहे.

लष्करी खर्चाच्या बाबतीत युक्रेन हा आठव्या क्रमांकाचा देश

दुसरीकडे, 2009 नंतर एका वर्षातील ही सर्वात मोठी वाढ आहे आणि सलग नवव्या वर्षी खर्चात वाढ झाली आहे. या वाढीत सर्वाधिक योगदान देणाऱ्या दहा देशांच्या लष्करी खर्चात कमालीची वाढ झाली आहे. याशिवाय, या वाढीमध्ये रशिया-युक्रेन युद्धाचाही मोठा हात आहे. मात्र, लष्करी खर्चाच्या बाबतीत युक्रेन आठव्या क्रमांकाचा देश राहिला. त्याचा खर्च 51 टक्क्यांनी वाढून 64.8 अब्ज डॉलरवर पोहोचला, जो त्याच्या एकूण जीडीपीच्या 37 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com