कोरोना महामारीनंतर 'या' विषाणूने युरोपमध्ये केला शिरकाव

दरम्यान, युरोपमध्ये कोरोना व्हायरसनंतर (Corona virus) आता आणखी एका नव्या व्हायरसने दस्तक दिली आहे.
H5 bird flu
H5 bird fluDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोना महामारीने (Corona) थैमान घातले आहे. सध्या लोक कोरोनाशी झुंज देत आहेत. दरम्यान, युरोपमध्ये कोरोना व्हायरसनंतर आता आणखी एका नव्या व्हायरसने दस्तक दिली आहे. यामुळे ब्रिटनमध्ये (Britain) नवी समस्या निर्माण झाली आहे. मध्य इंग्लंडमधील (England) पोल्ट्री युनिटमध्ये अत्यंत धोकादायक H5 बर्ड फ्लूचे (H5 bird flu) रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशाच्या कृषी मंत्रालयाने सोमवारी याची पुष्टी केली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हे सर्व संक्रमित पक्षी वॉरविकशायरमधील (Warwickshire) अल्सेस्टरजवळील (Alcester) पोल्ट्री फार्ममध्ये आहेत. संसर्ग टाळण्यासाठी हे सर्व पक्षी मारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

बर्ड फ्लूचा हा उद्रेक अशा वेळी झाला आहे, जेव्हा ब्रिटनने देशव्यापी एव्हियन इन्फ्लूएंझा प्रतिबंधक क्षेत्र (Avian Influenza Prevention Zone) घोषित केले आहे. या अंतर्गत फॉर्म आणि पक्ष्यांची काळजी घेणाऱ्या लोकांना जैवसुरक्षा निर्बंध कडक करण्यास सांगण्यात आले आहे. पूर्वी, नॉर्थ वेल्समधील एका व्यक्तीच्या घरात ठेवलेल्या कोंबड्यांमध्ये H5N1 स्ट्रेनची पुष्टी झाली होती. त्याच वेळी, पूर्व स्कॉटलंडमधील (Scotland) कुंपणात ठेवलेल्या कोंबड्यांमध्ये आणि मध्य इंग्लंडमधील (central England) पक्षी बचाव केंद्रामध्ये देखील H5N1 ची पुष्टी झाली.

H5 bird flu
Covid 19: युरोपमध्ये 5 लाख लोकांचा होऊ शकतो मृत्यू; WHO ने व्यक्त केली चिंता

पोलंडमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक

जागतिक प्राणी आरोग्य संघटना (OIE) ने सोमवारी सांगितले की, पोलंडमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये अत्यंत रोगजनक H5N1 बर्ड फ्लूचा अनेक प्रादुर्भाव आढळून आला आहे, ज्यामध्ये सुमारे 650,000 पक्ष्यांचे कळप आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून युरोपमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झपाट्याने वाढू लागला आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि डेन्मार्कमध्येही बर्ड फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बर्ड फ्लूच्या ताज्या उद्रेकादरम्यान फ्रेंच अधिकाऱ्यांनी सर्व मैदानी पोल्ट्री फार्मला प्राण्यांना घरामध्ये आश्रय देण्याचे आदेश दिले आहेत. संक्रमित आणि स्थलांतरित पक्ष्यांशी संपर्क टाळण्यासाठी शेतकर्‍यांना या हिवाळ्यात जाळी बसवण्यास आणि त्यांची कोंबडी बंद ठेवण्यास सांगितले आहे. देशाच्या कृषी मंत्रालयाने सांगितले की ऑगस्टच्या सुरुवातीपासून एव्हीयन इन्फ्लूएंझाची 130 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com