US Shot Down another Flying Object: अमेरिकेच्या आकाशात उडणाऱ्या वस्तू पाहण्याचे प्रकरण थांबत नाही. रविवारी (12 फेब्रुवारी) अमेरिकेने आणखी एक ऑब्जेक्ट खाली पाडले. ही वस्तू अमेरिका-कॅनडा सीमेवर दिसून आली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशानंतर अमेरिकन लष्कराच्या फायटर जेटने ही वस्तू पाडली.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात अमेरिका आणि कॅनडाच्या आकाशात अज्ञात उडणारी वस्तू दिसण्याची ही चौथी घटना आहे. यापूर्वी कॅनडाने अमेरिकन विमानांच्या मदतीने उडणारी वस्तू खाली पाडली होती.
अमेरिकेने आणखी एक यूएफओ पाडला
यूएस आर्मीच्या फायटर जेटने लेक हुरॉनवरील उडणारी वस्तू खाली पाडली आहे. यूएस-कॅनडाच्या सीमेवरील हुरॉन सरोवरावर ते दिसले. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लष्कराला ते खाली पाडण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर ते F-16 लढाऊ विमानांच्या सहाय्याने पूर्ण सावधगिरी बाळगत ही वस्तू खाली पाडण्यात आली.
ही वस्तू अष्टकोनी असल्याचे सांगितले जात आहे. जमिनीवरील कोणत्याही राष्ट्रांसाठी ही गोष्ट धोकादायक नसली तरी नागरी उड्डाणासाठी ती धोकादायक ठरू शकली असती, असे सांगितले जात आहे.
नुकतेच, कॅनडातील हवाई क्षेत्रात घुसल्यानंतर, अमेरिकेच्या लढाऊ विमानाने ही उडणारी वस्तू खाली पाडली होती. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शनिवारी (11 फेब्रुवारी) सांगितले की त्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. कॅनेडियन हवाई क्षेत्रात एक अज्ञात उडणारी वस्तू खाली पाडण्यात आली.
आठवड्यातील चौथी घटना
गेल्या एका आठवड्यात अमेरिका आणि कॅनडाच्या आकाशात UFO (अनआयडेंटिफाईड फ्लायिंग ऑब्जेक्ट) दिसण्याची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या चारपैकी 3 उडत्या वस्तू अमेरिकेच्या आकाशात दिसल्या, तर एक UFO कॅनडाच्या आकाशात दिसला. या चारही उडत्या वस्तू आता लढाऊ विमानांच्या माध्यमातून खाली पाडण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपुर्वीच पाडला होता चिनी स्पाय बलून
सर्वप्रथम, अमेरिकेच्या आण्विक साइटवर आकाशात दिसणारा एक चिनी स्पाय बलून बायडेन प्रशासनाने 4 फेब्रुवारी रोजी खाली पाडला होता. बायडेन प्रशासनाने चीनवर या बलुनद्वारे गुप्त माहिती गोळा केल्याचा आरोप केला होता तर चीनने स्पष्टीकरण देताना हा बलून केवळ हवामान संशोधनासाठी असल्याचे म्हटले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.