पाकिस्तानी दहशतवादी, श्रीलंकन तामिळ आणि बांगलादेशी रोहिंग्यांनंतर आता म्यानमारच्या लोकांनाही भारतात घुसखोरी करायची आहे.
अशा परिस्थितीत भारताने मिझोराम ते आसामपर्यंत सीमा सुरक्षा वाढवली आहे. जेणेकरुन कोणीही घुसखोर भारतात पाऊल टाकू शकणार नाही.
निर्वासितांना भारत सर्वात अनुकूल आणि सुरक्षित वाटतो. म्हणूनच ते सर्व भारतात स्थायिक होण्यासाठी येतात आणि येथे अनेक समस्या निर्माण करतात.
खरे तर, म्यानमारमध्ये (Myanmar) लोकशाहीची हत्या झाली असून तिथे लष्कराचे कुशासन आहे. अशा परिस्थितीत आता म्यानमारमधून मोठ्या प्रमाणात लोक भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही माहिती मिळताच आसाम रायफल्सने मिझोराममधील भारत-म्यानमार सीमेवरील 510 किलोमीटर लांबीच्या भागात सतर्कता वाढवण्याची घोषणा केली आहे. जेणेकरुन शेजारील देशांतील अवैध स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखता येईल.
"बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी आम्ही भारत-म्यानमार सीमेवरील बहुतेक क्रॉसिंग बंद करु. बेकायदेशीर घुसखोरीमुळे मिझोराममधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत आहे," असे आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, बांगलादेश (Bangladesh) आणि म्यानमार या दोन्ही देशांतील अनेक निर्वासित किंवा अवैध स्थलांतरितांनी बनावट भारतीय ओळखपत्रे मिळवली आहेत. मिझोरामची बांगलादेशशी 318 किलोमीटर लांबीची सीमा आहे.
अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, केंद्रीय निमलष्करी दल आसाम रायफल्स गृह मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचे बटालियन मुख्यालय एजॉल येथून जोखवासांग येथे हलवेल. जो
खवासंग राज्याच्या राजधानीपासून 15 किमी अंतरावर आहे. शेवटी ते असेही म्हणाले की, आत्तापर्यंत हस्तांतरणासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही आणि सामंजस्य करार तयार केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.