आता कोण घेणार जगातल्या सर्वात लहान महिलेची जागा?

जगातील सर्वात लहान महिला म्हणून तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.
Elif Kocaman

Elif Kocaman

Dainik Gomantak

Published on
Updated on

एकेकाळी जगातील सर्वात लहान महिला (Worlds shortest woman) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलिफ कोकमन (Elif Kocaman) यांचे निधन झाले आहे. ती फक्त 33 वर्षांची होती. एलिफ तुर्कीच्या उस्मानिया प्रांतातील कादिर्ली शहराची रहिवासी होती. जगातील सर्वात लहान महिला म्हणून तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे.

'मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, 2010 मध्ये एलिफचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये वर्षभरासाठी नोंदवले गेले होते. मंगळवारी एलिफ अचानक आजारी पडली, त्यामुळे तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, एलिफच्या शरीराच्या अनेक भागांनी काम करणे बंद केले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीची प्रकृती खालावली आणि गुरुवारी तीचा मृत्यू झाला.

<div class="paragraphs"><p>Elif Kocaman</p></div>
स्लिम-ट्रिम किम जोंग उनचा फोटो व्हायरल

एलिफची लांबी 72.6 सेंटीमीटर म्हणजेच 2.5 फूट होती. जेव्हा त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवले गेले तेव्हा ती म्हणाली होती, "मला नेहमीच आशा होती की एक दिवस हे जग मला ओळखेल. लहानपणी शाळेतील मुले मला माझ्या उंचीमुळे खूप चिडवायची. पण त्यामुळे मला वेगळी ओळख मिळाली. आता मला माझ्या उंचीचा खूप अभिमान वाटतो. देवाने मला वेगळ्या पद्धतीने बनवले आहे. आणि मला खात्री आहे की मला माझा खरा जीवनसाथीही कधीतरी सापडेल. जन्माच्या वेळी एलिफचे वजन मोजले गेले तेव्हा तीचे वजन 1.6 किलोग्रॅम होते.

एलिफच्या आईने "आम्ही याआधी कधीही एलिफची लांबी पाहिली नाही. पण हळूहळू इतर मुलांच्या तुलनेत तिच्या उंचीची वाढ हळू हळू वाढत असल्याचे आमच्या लक्षात आले. जेव्हा ती 4 वर्षांची झाली तेव्हा तिची वाढ होणे बंद झाले आणि त्यानंतर तिची उंची कायमची फक्त 2.5 फूट राहिली. आम्ही अनेक डॉक्टरांची तपासणी केली. पण त्यांचेही प्रयत्न असफल राहिले त्यानंतर ती 10 वर्षांची झाली तेव्हा आम्ही आशा करणे सोडले, असे एलिफच्या आईने सांगितले.

<div class="paragraphs"><p>Elif Kocaman</p></div>
New Year's Eve: पाकिस्तानमध्ये गोळीबार 1 ठार, 18 जखमी

2011 मध्ये अमेरिकेच्या ब्रिजेट जॉर्डनने एलिफचा सर्वात लहान मुलगी होण्याचा विक्रम मोडला. त्यांची लांबी 69 सेंटीमीटर म्हणजेच 2.3 फूट होती. जून 2019 मध्ये जॉर्डनचा मृत्यू झाला. आणि आता हा विश्वविक्रम भारताच्या ज्योती किसनजी यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यांची लांबी 62.8 सेंटीमीटर म्हणजेच 62.8 फूट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com