अफगाणिस्तानचे (Afghanistan) माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई (Hamid Karzai) यांनी पाकिस्तानला (Pakistan) अफगाणिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणापासून दूर होऊन होऊन पाकिस्तानने अफगाणिस्तानला तशीच मदत करावी जशी की आंतरराष्ट्रीय व्यवहारात एक देश दुसऱ्या देशाला करते असे सांगत करजई यांनी व्हॉईस ऑफ अमेरिकाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या आहेत. (Afghanistan's former president Hamid Karzai warn Pakistan)
करझाई म्हणाले, "आमच्या मित्र देश पाकिस्तानला संदेश आहे की, जगात अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करू नका." माजी राष्ट्रपती म्हणाले की, पाकिस्तानने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करून अफगाणिस्तानशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करू नये. पाकिस्तानने अफगाणिस्तानशी योग्य प्रकारे संबंध प्रस्थापित केल्यास आम्हाला आनंद होईल. अफगाणिस्तानमध्ये इसिसच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त करताना करझई म्हणाले, "हे अफगाणिस्तान आणि संपूर्ण जगासाठी देखील धोकादायक आहे."
तत्पूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानला जाण्यासाठी एक हजारांहून अधिक अफगाण विद्यार्थ्यांना तोरखम सीमा ओलांडण्याची परवानगी दिली आहे. काबूलमधील पाकिस्तानी दूतावासाच्या हवाल्याने खामा प्रेसने ही माहिती दिली असून तालिबान्यांनी काबूल ताब्यात घेतल्यापासून हे विद्यार्थी पाकिस्तानमध्ये अडकल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना आतापर्यंत दोन वेगवेगळ्या भागांत अफगाणिस्तानला पाठवण्यात आले आहे.
तर दुसरीकडे तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून अफगाणिस्तानात मोठे बदल वाद पाहायला मिळत आहेत त्यातच तालिबानने आता अफगाण संसदेचे कामकाज प्रसारित करणाऱ्या संस्थेचे नाव बदलले आहे आणि त्याने प्रसारित केलेल्या कार्यक्रमांची यादीही बदलली आहे. पूर्वी या संस्थेचे नाव होते वेलबिलिअरी रेडिओ आणि टेलिव्हिजन.पण आता त्याचे नाव बदलून अल हिजरा असे करण्यात आले आहे. यासह, संस्थेने इस्लामिक परंपरा असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण सुरू केले आहे. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानातील जवळपास 70 टक्के वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल वृत्तवाहिन्या बंद झाल्या आहेत.
दरम्यान इराणने 27 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान आणि रशिया या पाच शेजारी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अफगाणिस्तानमधील ताज्या परिस्थितीवर चर्चा केली जाईल. रशिया, चीन, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.