तालिबानची (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) सत्ता आल्यापासून महिला आणि मुलांच्या सुरक्षेबद्दल सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानच्या राजवटीत महिलांची स्थिती आणखी बिघडेल अशी भिती व्यक्त केली जाते आहे. महिलांना बाहेर जाऊ दिले जाणार नाही, त्यांना स्वतंत्रपणे काहीही करू दिले जाणार नाही, अशी भिती व्यक्त केली जाते आहे, कारण अनेक वर्षांपूर्वीच्या तालिबानी राजवटीच्या कथा अजूनही महिलांच्या अफगाणिस्तानमध्ये जिवंत आहेत. मात्र अशातच महिला पत्रकार क्लॅरिस वॉर्ड (Clarissa Ward) चर्चेत आल्या आहेत. अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टींग करत असतानाची त्यांचे काही फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होता आहेत.
काबूल विमानतळावरील भयानक व्हीडीओ सध्या जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल होता आहेत. त्याचवेळी क्लॅरिसा वार्ड या अमेरिकन टीव्ही रिपोर्टरचा एक फोटो देखील व्हायरल होत होता, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “या महिला पत्रकाराला 24 तासात स्वतःला बदलावे लागले आहे." पूर्वी ही महिला पत्रकार हिजाबशिवाय फिरू शकत होती, मात्र आता ती हिजाब घालून आपले काम करत आहे. यावरुन स्त्रियांच्या स्थितीचा अंदाज घेता येईल, त्यांच्यासाठी वेळ किती वाईट असेल. विचार करा किती भीती आहे.”
मात्र, आता या टीव्ही रिपोर्टरने स्वतः ते फोटो शेअर करत त्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ट्विटरवर व्हायरल होणारी दोन्ही छायाचित्रे घेऊन त्यांनी लिहिले, की माझ्या फोटोच्या ‘मिम’मध्ये दिलेला मजकुर चुकीचा आहे. पहिला फोटो खाजगी प्रॉपर्टीतील कंपाऊंडच्या आतला आहे आणि दुसरा फोटो तालिबानशासित काबूलचा आहे. मी पूर्वी सुद्धा काबूलमध्ये रिपोर्टींग करताना डोक्यावर स्कार्फ बांधत असे. मात्र पुर्वी माझे डोके पूर्णपणे झाकलेले नसायचे आणि मी ओबाया पोशाखात सुद्धा नसायचे असे म्हणत त्यांनी हे सुद्धा कबूल केले की थोडा बदल झाला आहे, परंतु चित्रात दाखवल्याप्रमाणे एवढा मोठा बदल झाला नाही.
क्लेरिसा वार्ड बर्याच काळापासून युद्धग्रस्त देशांमध्ये जाऊन रिपोर्टींग करतात. सोमवारी त्यांनी स्वतः तिच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्या तालिबानी दहशतवाद्यांसोबत हिजाब घातलेल्या दिसता आहेत. सोशल मिडीयावर अनेक लोकांनी असेही लिहिले की जर तुम्ही हिजाब घातला नाही तर तुमचे आयुष्य संकटात येऊ शकते. तसेच, काही लोक असेही म्हणताना दिसले की ज्यांना तालिबान राजवटीत महिलांच्या स्थितीबद्दल चिंता आहे, ते पहा की महिला पत्रकार तालिबानला किती आरामात रिपोर्टींग करता आहेत. त्याच वेळी, काही वापरकर्त्यांनी हिजाब घातलेल्या त्यांच्या रिपोर्टींगला तालिबानच्या गुलामगिरीशी देखील जोडले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.