Afghanistan Earthquake: भूकंपाने हादरले अफगाणिस्तान! 622 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक जखमी; दिल्लीपर्यंत जाणवले हादरे VIDEO

Afghanistan Earthquake Video: भारताचा शेजारी देश अफगाणिस्तान एका रात्रीत भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. रविवार (31 ऑगस्ट) मध्यरात्री देशात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवले.
Afghanistan Earthquake Video
Afghanistan EarthquakeDainik Gomantak
Published on
Updated on

Afghanistan Earthquake Video: भारताचा शेजारी देश अफगाणिस्तान एका रात्रीत भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. रविवार (31 ऑगस्ट) मध्यरात्री देशात एकापाठोपाठ एक भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यामुळे लोकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. या विनाशकारी भूकंपाचे धक्के भारताच्या दिल्ली-एनसीआर भागातही जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी नुसार, अफगाणिस्तानमध्ये रात्रीपासून सकाळपर्यंत 6.3 तीव्रतेपासून ते 5 तीव्रतेपर्यंत अनेक भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत.

यूएस जिओलॉजिकल सर्वे नुसार, या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानच्या बसावुलपासून 36 किलोमीटर दूर होते. या भूकंपांमुळे अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत 662 हून अधिक लोकांच्या मृत्यूची आणि 1500 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची बातमी आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भूकंपाच्या धक्क्यांची मालिका

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या मते, अफगाणिस्तानमध्ये पहिला भूकंप (Earthquake) रात्री 12 वाजून 47 मिनिटांनी आला, ज्याची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.3 मोजली गेली. या शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांनंतर रात्रभर आणि सकाळीही अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले.

  • रात्री 12 वाजून 47 मिनिटांनी 6.3 तीव्रतेचा भूकंप.

  • रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी 4.7 तीव्रतेचा भूकंप.

  • रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी 4.3 तीव्रतेचा भूकंप.

  • रात्री 3 वाजून 03 मिनिटांनी 5 तीव्रतेचा भूकंप.

  • सकाळी 5 वाजून 16 मिनिटांनी 5 तीव्रतेचा भूकंप.

दरम्यान, या सततच्या भूकंपाच्या मालिकेने संपूर्ण अफगाणिस्तान (Afghanistan) हादरले आह. एजेंस प्रेसने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या शक्तिशाली भूकंपामुळे कमीतकमी 662 लोकांचा मृत्यू झाला असून 1500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कुनार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नूर गुल, सोकी, वटपूर, मनोगी आणि चापाडारे जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावले आहेत. मृतांचा आकडा 662 पेक्षाही जास्त असू शकतो, असा दावा अनेक अहवालांमध्ये केला जात आहे.

अफगाणिस्तानसाठी भूकंप नवीन नाही

अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या घटना नवीन नाहीत. यापूर्वीही 7 ऑक्टोबर 2023 रोजी येथे 6.3 तीव्रतेचा भूकंप आला होता, ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तालिबान सरकारने या भूकंपात कमीतकमी 4,000 लोकांच्या मृत्यूचा अंदाज वर्तवला होता. गेल्या काही वर्षांतील हा अफगाणिस्तानमध्ये आलेला सर्वात भयानक नैसर्गिक आपत्तींपैकी एक होता.

याशिवाय, अफगाणिस्तानमध्ये यापूर्वीही अनेक मोठे भूकंप आले आहेत:

  • 1982: 6.6 तीव्रतेचा भूकंप, 450 लोकांचा मृत्यू.

  • 1991: 6.9 तीव्रतेचा भूकंप, 848 लोकांचा मृत्यू.

  • 1998: 5.9 तीव्रतेचा भूकंप, 2,323 लोकांचा मृत्यू.

  • 2002: 6.1 तीव्रतेचा भूकंप, 2,000 लोकांचा मृत्यू.

  • 2015: 7.5 तीव्रतेचा भूकंप, 399 लोकांचा मृत्यू.

  • 2022: 6.0 तीव्रतेचा भूकंप, 1,1163 लोकांचा मृत्यू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com