Afghan Crisis: पाकिस्तानने बोलावली बैठक, चीन आणि इराणही राहणार उपस्थित

परराष्ट्र कार्यालयाच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Foreign Minister Shah Mahmood Qureshi) चीन, इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्यासोबत बैठकीचे अध्यक्ष असतील.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने अखेर अंतरिम सरकार स्थापन केले आहे. मात्र दुसरीकडे या सरकारबद्दल अफगाण नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. येत्या काळात तालिबानचे सरकार कसे असेल? या भितीने अफगाण नागरिक आपली मातृभूमी सोडून पळ काढू लागले आहेत. यातच आता अफगाणिस्तानमध्ये स्थापन झालेल्या तालिबानच्या सरकारला (Taliban Government) पाठिंबा देण्यासाठी चीन, पाकिस्तान (Pakistan) पुढे सरसावला आहे. त्यामुळे युद्धग्रस्त देशाच्या ताज्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानच्या शेजारील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची व्हर्चुअल बैठक बोलावली आहे. परराष्ट्र कार्यालयाच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी (Foreign Minister Shah Mahmood Qureshi) चीन (China), इराण, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्यासोबत बैठकीचे अध्यक्ष असतील.

Imran Khan
PAK मुळे तालिबान मध्ये फूट! मुल्ला बरादर आणि हक्कानी आमने-सामने

अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पाकिस्तानच्या आमंत्रणावर आयोजित केली जात आहे. परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, अफगाणिस्तानमधील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि प्रादेशिक स्थिरता आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. शांततापूर्ण आणि स्थिर अफगाणिस्तानच्या समान उद्देशासाठी अफगाणिस्तानच्या शेजारील देशांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानसाठी अंतरिम सरकारची घोषणा केल्याच्या एक दिवसानंतर ही बैठक झाली. नव्या सरकारला मान्यता देण्याच्या मुद्यावरही बैठकीत चर्चा होऊ शकते. ऑगस्टच्या मध्यावर तालिबानने युद्धग्रस्त अफगाणिस्तानचा ताबा घेतला आणि पाश्चिमात्य देशांच्या पाठिंब्याने निवडून आलेले सरकार उलथवून टाकले.

अफगाणिस्तानात नवीन सरकारची स्थापना

तालिबानने अंतरिम इस्लामिक सरकार स्थापनेची घोषणा केली आहे. मुल्ला हसन अखुंद हे अफगाणिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान असतील, तर मुल्ला बरदार यांना उपपंतप्रधान बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर हक्कानी नेटवर्कचे सिराजुद्दीन हक्कानी यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकन युती फौज आणि अफगाणिस्तान सरकारच्या विरोधात दोन दशके लढा देणाऱ्या तालिबानच्या प्रमुख नेत्यांना महत्त्व देत नवीन सरकारमध्ये 33 मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Imran Khan
Afghanistan Government: मुल्ला हसन अखुंद होणार तालिबान सरकारचा प्रमुख

शरिया कायदा अफगाणिस्तानात लागू होईल

तालिबानचे सर्वोच्च नेते मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होईल. वृत्तसंस्था स्पुतनिकने अखुंदजादाच्या वक्तव्याचा हवाला देत म्हटले आहे की, भविष्यात शासन आणि जीवनाशी संबंधित सर्व मुद्दे शरिया कायद्यानुसार सोडवले जातील. इस्लामच्या चौकटीत राहून लोकांचे आणि अल्पसंख्यांकांचे अधिकार संरक्षित केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com