'ही तुमची बायको, कृपया तिला मारु नका'; उदरनिर्वाहासाठी बापानेच विकले मुलीला

अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी कथा 9 वर्षांच्या परवाना मलिकची आहे.
Afghan Girl
Afghan GirlDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमधील (Afghanistan Crisis) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे लोकशाहीवादी सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी (Taliban) सत्ता आपल्या ताब्यात घेतली. तालिबान्यांना सत्ता स्थापन्यासाठी पाकिस्तानने मदत केली असल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावरुन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील आर्थिक स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. लोक उदरनिर्वाहासाठी अनेक टोकाची पावले उचलू लागली आहेत. यातच आता अफगाण नागरिकांना दोन वेळची भाकरीही मिळत नाहीये. आता या समस्येचे गंभीर परिणामही दिसून येत आहेत. पोटापाण्यासाठी घरातील वस्तू विकल्यानंतर आता लोक आपल्या मुलीही विकू लागले आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी कथा 9 वर्षांच्या परवाना मलिकची आहे. वडिलांनी तिला गेल्या महिन्यात एका 55 वर्षीय व्यक्तीला विकले. त्याबदल्यात कुटुंबाला दोन लाख रुपये मिळाले.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, लहानग्या परवाना मलिकच्या कुटुंबात आठ लोक आहेत. आता या कुटुंबाकडे जगण्यासाठी पैसे नाहीत. घरात ना धान्य ना तेल. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी या कुटुंबाकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. वडिलांनी आपल्या 9 वर्षांच्या मुलीला 55 वर्षीय अफगाण व्यक्तीला विकले. मात्र, मुलीवर अत्याचार करु नका अशी विनंतीही या व्यक्तीकडे केली आहे.

2200 डॉलर्समध्ये करार केला

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, 55 वर्षीय कुर्बान 2200 डॉलर (सुमारे 2 लाख अफगाण रुपये) घेऊन मलिकच्या घरी पोहोचला. परवानाच्या वडिलांना मेंढ्या, जमीन आणि रोख स्वरुपात 2 लाख अफगाण रुपये दिले, आणि 9 वर्षांच्या परवानाचा ताबा घेतला. तेव्हा वडील मलिक यांनी कुर्बानला विनंती केली होती, 'ही तुझी वधू आहे. तीची काळजी घ्या. मारहाण करु नका.'' कुर्बानने परवानाचे वडील मलिक यांना मुलीला मारहाण करणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच तिच्याशी आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे वागणूक देऊ.

Afghan Girl
तालिबानच्या टॉप कमांडरचा बॉम्ब स्फोटात मृत्यू

12 वर्षाच्या मुलीला आधी विकले होते

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत परवानाचे वडील अब्दुल मलिक यांनी आणखी धक्कादायक खुलासा केला आहे. अब्दुल मलिकने मुलाखतीदरम्यान सांगितले की, 'काही महिन्यांपूर्वी मी माझ्या 12 वर्षांच्या मुलीला पोट भरण्यासाठी विकले होते. आता कुटुंबातील इतर सदस्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्याला दुसरी मुलगी विकावी लागली.'' अब्दुल मलिक पुढे म्हणाले की, या निर्णयानंतर मी आणि आमचे कुटुंब पूर्णपणे ढासळले आहे. संपूर्ण कुटुंब चिंता, पश्चात्ताप, अपराधीपणा आणि लज्जीत आहे.

परवाना काय म्हणाली?

त्याच वेळी, सिनएनएनने अनोळखी व्यक्तीला विकलेल्या परवानाशी संवाद साधला. लग्नाच्या विचाराने परवाना घाबरली. मुलगी म्हणाली, 'मला पुढे शिकून शिक्षिका व्हायचे आहे. पण आता मला एका वृद्धाला विकण्यात आले आहे. तो माझ्याशी लग्न करेल अन् माझं आयुष्य संपून जाईल. लग्नानंतर म्हातारा मला मारहाण करेल आणि घरातील सर्व कामे करायला भाग पाडेल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com