इंग्लंडमध्ये 90 वर्षानंतर जन्माला आला विचित्र प्राणी

हॅरी पॉटर (Harry Potter) या हॉलीवुड चित्रपटामधील व्यक्तिरेखेवरून त्याचे नाव डॉबी ठेवण्यात आले आहे.
Dobby
DobbyTwitter
Published on
Updated on

जगात अनेक प्राण्यांच्या प्रजाती आहेत ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बऱ्याच वेळा असे घडते की अचानक काही विचित्र प्राणी दिसतात, जे कधीतरी दिसले आहेत. सध्या इंग्लंडमधील एका प्राणीसंग्रहालयात (zoo) अशा प्राण्याने (Animal) जन्म घेतला आहे, जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हा प्राणी आर्डवार्क (Aardvark) प्रजातीचा असल्याचे सांगितले जात आहे. या प्राण्याचा जन्म होताच जगभरात या प्रजातीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

या आर्डवार्कचा जन्म इंग्लंडमधील चेस्टर (Chester Zoo) येथील प्राणीसंग्रहालयात झाला होता. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून (Website) याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्राणीसंग्रहालयात नव्वद वर्षानंतर प्रथमच आर्डवार्क जन्माला आल्याचे सांगितले जाते. हॅरी पॉटर (Harry Potter) या हॉलीवुड चित्रपटामधील व्यक्तिरेखेवरून त्याचे नाव डॉबी ठेवण्यात आले आहे.

Dobby
इम्रान खान सरकार भारतापुढे झुकण्यास तयार!

या फिमेल आर्डवार्कची रचना विचित्र आहे. त्याचे मोठे कान, केस नसलेली सुरकुतलेली त्वचा आणि मोठे नखे आहेत. त्यांची खूप काळजी घेतली जात आहे, काही तासाने त्याला जेवण दिले जात आहे आणि तज्ञांची टीम त्याच्यावर सतत नजर ठेवत आहे. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यानी सांगितले की, शेतकऱ्यांशी (Farmers) झालेल्या संघर्षामुळे आर्डवार्कची (Aardvark) संख्या कमी होत आहे आणि त्यांची मासांसाठी शिकार केली जात आहे.

अनेक अहवालानुसार उप-सहारा आफ्रिकेत आर्डवार्क सापडेल आहेत परंतु आता त्यांची संख्या सतत कमी होत आहे. युरोपमधील प्राणीसंग्रहालयात फक्त 66 आर्डवार्क उरले आहेत आणि जगातील प्राणीसंग्रहालयात फक्त 109 आहेत. आर्डवार्क या शब्दाचा आफ्रिकन भाषेत अर्थ 'डुक्कर' असा होतो. सध्या त्याच्या जन्मानंतर, आर्डवार्क प्रजातीबद्दल सोशल मिडियावर (Social Media) चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com