चार भारतीयांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्याला अमेरिकन कोर्टाने केलं मुक्त

मानवी तस्करीचा आरोप असलेल्या फ्लोरिडामधील (Florida) नागरिकाला अमेरिकन कोर्टाने बॉण्डशिवाय तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
American Court
American CourtDainik Gomantak
Published on
Updated on

मानवी तस्करीचा (Human Trafficking) आरोप असलेल्या फ्लोरिडामधील नागरिकाला अमेरिकन कोर्टाने बॉण्डशिवाय तुरुंगातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीवर दोन भारतीयांची अमेरिकेत (America) अवैध वाहतूक आणि कॅनडाजवळ (Canada) कडाक्याच्या थंडीमुळे चार भारतीयांचा (Indians) मृत्यू झाल्याचा आरोप आहे. (A US Court Has Ordered The Release Of A Florida Man Accused Of Human Trafficking)

दरम्यान, आरोपी स्टीव्ह शँडला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. अमेरिकेन कायद्याचे उल्लंघन करुन बेकायदेशीरपणे स्थलांतरितांना देशात आणल्याचा त्याच्यावर आरोप होता. 20 जानेवारी रोजी, तो प्रथमच अमेरिकेतील मिनेसोटा जिल्हा न्यायालयात न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर झाला. त्यानंतर त्याला 24 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

American Court
बुर्किना फासोमध्ये तख्तापलट! बंडखोर सैनिक म्हणाले...आता लष्कराने देश व्यापला

तसेच, अमेरिकन वृत्तपत्र ग्रँड फोर्क्स हेराल्डच्या मते, ''शँड 24 जानेवारी रोजी दिसला होता. खटला प्रलंबित होईपर्यंत त्याला सशर्त मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. जोपर्यंत त्याला फ्लोरिडाला परत पाठवले जात नाही तोपर्यंत त्याला कोठडीत राहावे लागणार आहे. दरम्यान, न्यायाधीशांनी त्याच्या जामिनाच्या अटी निश्चित केल्या. त्याला पासपोर्ट न्यायालयाकडे सादर करण्याचे आणि सुनावणीच्या वेळी कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. दोषी आढळल्यास तुरुंगात जावे लागेल, अशी अटही घातली होती.''

शिवाय, शँडने त्याच्या व्हॅनमधून वैध कागदपत्रांशिवाय कॅनडातून दोन भारतीयांना अमेरिकेत नेले होते. कॅनडा-अमेरिका सीमेपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातून त्याला पकडण्यात आले. या दोन भारतीय आणि शँड यांना पेंबिना सीमा चौकीवर आणले जात असताना सुरक्षा यंत्रणांना तिथे आणखी पाच भारतीय आढळले. ते मिनेसोटामधून गॅस प्लांटकडे जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com