पाकिस्तानात सरकार टिकणार की पडणार? इम्रान खान यांचं आज ठरणार भविष्य

पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या अजेंड्यामध्ये आज दुपारी 4 वाजता इम्रान खान (Imran Khan) सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Imran Khan
Imran KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानमध्ये राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. सत्तेत असणाऱ्या इम्रान खान सरकारवर सत्ता सोडण्याची टांगती तलवार आहे. याच पाश्वभूमीवर पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या अजेंड्यामध्ये आज दुपारी 4 वाजता इम्रान खान (Imran Khan) सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष PML-N आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (JUI) यांनी लाँग मार्चचे आयोजन केले आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफच्या (PTI) राजवटीत वाढत्या महागाईविरोधात आवाज उठवण्यासाठी आज विरोधक इस्लामाबादमध्ये (Islamabad) पोहोचणार आहे. त्यामुळे आज दुपारनंतर इस्लामाबादमधील राजकीय घडामोडींना अधिक वेग येऊ शकतो. एक दिवस आधीच पंतप्रधान इम्रान खान यांनीही राजधानीत एका मोठ्या रॅलीला संबोधित केले होते. ज्याला त्यांनी 'जलसा' असे नाव दिले. (A no confidence motion will be tabled against Imran Khan's government today)

दरम्यान, पाकिस्तानातील (Pakistan) वृत्तपत्रांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, जमहूरी वतन पार्टीच्या शाहझैन बुगती यांनी सत्ताधारी आघाडी सोडण्याचा निर्णय घेतला असून, 342 सदस्यीय सभागृहात ट्रेझरी बेंचचे संख्याबळ 178 आहे. विरोधी पक्षाला 163 सदस्यांसह पीएमएल-क्यूचा पाठिंबा आहे. बलुचिस्तान अवामी पार्टी आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान, 17 सदस्यांसह सरकारच्या तीन प्रमुख सहयोगींनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकाकंडून वाटाघाटी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, या सगळ्यात इम्रान खान यांचे सरकार संकटात सापडले आहे. त्यांना समर्थनार्थ बहुमत मिळालेले नाही, तर दुसरीकडे सरकार पडण्याची खात्री आहे.

Imran Khan
पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, पक्षाचे 50 मंत्री झाले 'बेपत्ता'

इम्रान खान सरकारवर टांगती तलवार

जर स्पीकरने पहिल्यांदा प्रस्ताव मांडण्याची परवानगी दिली आणि सात दिवसांनंतर मतदानासाठी बोलले तर सत्ताधारी पक्षाचे डझनभर असंतुष्ट नेते स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार मतदान करु शकतात. अशा परिस्थितीत, प्रकरण गुंतागुंतीचे होऊ शकते. कारण पाकिस्तानची घटना पंतप्रधानांना सभागृह विसर्जित करण्याची आणि प्रस्ताव मांडल्यानंतर नव्याने निवडणुका घेण्याची परवानगी देत नाही.

Imran Khan
इम्रान खान सरकार अडचणीत; विरोधक दाखल करणार अविश्वास प्रस्ताव 

इम्रान खानसमोर काय पर्याय आहेत?

जर पीएम खान यांना विश्वासदर्शक ठरावात बहुमत मिळाले नाही तर समस्या वाढू शकतात. असे झाल्यास विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सर्वात मोठा पक्ष पीएमएल-एन सरकार स्थापन करु शकतो. परंतु जर पंतप्रधान इम्रान खान यांनी हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी सभागृह विसर्जित करुन नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस केली तर ना सरकारचे नेतृत्व केले जाऊ शकते ना तिसरा कोणीही सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करु शकणार. दुसरीकडे पंजाब विधानसभेत पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार (Usman Bujdar) यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com