Donald Trump यांच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका सुरुच; गोपनीय कागदपत्रे बाळगल्याबाबत चालणार खटला

White House : नॅशनल आर्काइव्हजने ट्रम्प आणि त्यांच्या टीमने व्हाईट हाऊसमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान अध्यक्षीय रेकॉर्डशी संबंधित कागदपत्रे परत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अनेक महिन्यांनी सुमारे 200 वर्गीकृत कागदपत्रे परत करण्यात आली.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. वास्तविक, गोपनीय कागदपत्रांशी संबंधित प्रकरणात ट्रम्प यांच्यावर आरोप आहेत आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात शेकडो गोपनीय कागदपत्रे आपल्याकडे ठेवल्याचा आरोप आहे. तसेच चुकीची विधाने केली. तपास यंत्रणांनी ट्रम्प यांच्यावर सात फेडरल गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोप निश्चित केले आहेत.

अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ट्रम्प यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये दाखल झालेला हा सातवा गुन्हा आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की त्यांना मंगळवारी मियामी फेडरल कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स प्राप्त झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल आर्काइव्हजने ट्रम्प आणि त्यांच्या टीमला व्हाईट हाऊसमध्ये वास्तव्यादरम्यान अध्यक्षीय रेकॉर्डशी संबंधित कागदपत्रे परत करण्याची मागणी केली होती.

मात्र, अनेक महिन्यांनंतर सुमारे 200 वर्गीकृत कागदपत्रे परत करण्यात आली. यापूर्वी, एफबीआयने ऑगस्ट 2022 मध्ये ट्रम्प यांच्या काही ठिकाणांववर शोध मोहीम राबवली होती, ज्यामध्ये एफबीआयने 100 हून अधिक गोपनीय कागदपत्रे जप्त केली होती.

नवे आरोप केल्यानंतर ट्रम्प यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, 'अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांसोबत असे काही घडेल, असे त्यांना कधीच वाटले नव्हते! आजवरच्या सर्व राष्ट्रपतींपैकी सर्वाधिक मते मिळविलेल्या आणि सध्याच्या अध्यक्षांपेक्षा अधिक लोकप्रिय असलेल्या व्यक्तीबाबत हे घडत आहे. मी निर्दोष आहे.

ट्रम्प म्हणाले की, 'अमेरिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. एक देश म्हणून आमची झपाट्याने घसरण होत आहे, पण एकत्र येऊन आम्ही अमेरिकेला पुन्हा महान बनवू.

Donald Trump
Kashmir Hijab Protest: कर्नाटकनंतर काश्मीरच्या मुस्लिम विद्यार्थिनींनी खोलला मोर्चा, हिजाब वादाच्या धर्तीवर...!

डोनाल्ड ट्रम्प हे 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही दावेदार आहेत. मात्र, यापूर्वी लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात त्याला दंड ठोठावण्यात आला होता. आता ते गोपनीय कागदपत्रांशी संबंधित प्रकरणातही अडकत असल्याचे दिसत आहे. यामुळे ट्रम्प यांच्या 2024 च्या प्रचाराला धक्का बसू शकतो.

Donald Trump
Greater Nepal Map: काठमांडूच्या महापौरांचा यूपी-बिहारवर दावा! ग्रेटर नेपाळच्या नकाशामुळे वातावरण तापले

व्हाईट हाऊसच्या त्या गुप्त फाईल्समध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या इराणवरील हल्ल्याशी संबंधित माहितीचा समावेश होता. दुसरीकडे, ट्रम्प यांच्या विधानाबाबत (ऑडिओ रेकॉर्डिंग) न्याय विभागाकडून तात्काळ कोणतीही पुष्टी झालेली नाही. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्यावर कोणते आरोप निश्चित करण्यात आले आहेत, हे फेडरल कोर्टाने अद्याप सांगितलेले नाही.

 ट्रम्प यांच्या वकीलांपैकी एक, जिम ट्रस्टी यांनी सांगितले की, त्यांच्या आशिलावर हेरगिरी कायद्याचे उल्लंघन करून जाणूनबुजून कागदपत्रे बाळगणे, खोटी विधाने करणे, न्यायात अडथळा आणणे आणि कट रचणे यासह सात गुन्ह्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. आणि त्यामुळे ट्रम्प यांना १३ जून रोजी दुपारी ३ वाजता मियामी येथील फेडरल कोर्ट हाऊसमध्ये हजर राहावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com