लिस्बन येथे 67 वर्षीय महिलेला पोलीसांनी केली अटक

बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, लहान बालकांचा छळ करणे यांसारखे गुन्हे दाखल
Marvila News
Marvila News Dainik Gomantak
Published on
Updated on

पौर्तुगालची राजधानी लिस्बन येथे एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लिस्बन येथील मार्व्हिल परिसरातून विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये एका 67 वर्षीय महिलेला अटक पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेस बेकायदेशिर शस्त्र बाळगणे, लहान बालकांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे. यांसारख्या गुन्ह्याखाली ताब्यात घेण्यात आले आहे. (67-year-old woman has been arrested by police in Lisbon. )

मिळालेल्या माहितीनुसार 67 वर्षीय महिला लहान मुलांना मारहाण करत असल्याचे समोर आले आहे.या महिलेला बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि मुलांना सोडून देण्यासारखे गुन्हे दाखल केले आहेत. महिलेकडे देखरेखीसाठी मुले होती. मुलांचे पालक दिवसभर काम करत तर संध्याकाळी परतताना आपल्या मुलांना घेऊन जात. दरम्यानच्या काळात महिला मुलांचा छळ करत असल्याची बाब समोर आली आहे.

Marvila News
Taliban In Afghanistan: तालिबान महिलांच्या हक्कांवर पुन्हा अंकुश

या मुलांपैकी एक विद्यार्थिनी, एक मुलगी, शारिरीक अत्याचाराची शिकार झाली असल्याचा संशय आहे. त्यापैकी एक वर्षीच्या बालकाला घरकुलात सुस्थितीत न ठेवता घरकुलात खुल्याअवस्थेत सोडल्याची धक्कादाक बाब समोर आली आहे. या बालकाला तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.

Marvila News
जगभरात प्रदूषणामुळे 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू, भारत अन् चीनमध्ये सर्वाधिक

महिलेच्या घरी पोहोचल्यावर पोलिसांना सुरुवातीला आत येऊ देण्यास तीने मज्जाव केला. मात्र पोलीस अधिकार्‍यांनी आत प्रवेश केला असता महिलेने विनाअट बालसंगोपन करणे सुरु केले होते. यात शासनाच्या कोणत्या ही नियमांचे पालन केले नसल्याचं समोर आलं लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचीबाब समोर आली आहे. या महिलेला पोलीसांनी सशर्त जामीनांवर सोडण्यात आले आहे. मात्र तिला तिच्या घऱातच राहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com