फ्रान्समध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेने दिली दस्तक; 10,000 हून अधिक आढळले रुग्ण

जगभरात कोरोनाचा (Covid 19) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच आता फ्रान्समध्ये (France) कोरोनाच्या पाचव्या लाट आली आहे.
France
FranceDainik Gomantak
Published on
Updated on

जगभरात कोरोनाचा (Covid 19) प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच आता फ्रान्समध्ये (France) कोरोनाच्या पाचव्या लाट आली आहे. याविषयी माहिती देताना देशाचे आरोग्य मंत्री ऑलिव्हर व्हेरन (Olivier Veran) म्हणाले की, ज्यांना कोरोनाचा संसर्ग कमी झाला असं वाटत त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब आहे. स्थानिक माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मंत्री व्हेरन यांनी पुष्टी केली की, इतर अनेक शेजारील देशांप्रमाणेच आमच्याही देशातही कोरोनाच्या पाचव्या लाटेने दस्तक दिली आहे. तसेच या पाचव्या लाटेदरम्यान कोरोनाचा प्रसार वेगाने वाढू लागला असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

वेरन पुढे म्हणाले, 'अनेक शेजारी देश आधीच कोरोना साथीच्या पाचव्या लाटेचा सामना करत असून, फ्रान्समध्ये आपण जे अनुभवत आहोत ते पाचव्या लाटेच्या प्रलयापूर्वीची स्थिती आहे. फ्रेंच आरोग्य मंत्रालयाने 11,883 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असल्याचे सांगितले आहे. नवीन रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी 10,000 च्या वर राहिली आहे. (France Coronavirus Cases). ऑक्टोबरच्या मध्यापासून, संसर्गाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याआधी राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनीही देशात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकते, असे म्हटले होते.

France
रशियामध्ये दिवसेंदिवस वाढत चालले कोरोनाचे संकट

ज्येष्ठांना पुरावे दाखवावे लागतील

या आठवड्याच्या सुरुवातीला, मॅक्रॉन म्हणाले होते की, 65 आणि त्याहून अधिक वयातील लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांना रेस्टॉरंटमध्ये जाण्यापूर्वी, सांस्कृतिक कार्यक्रमात जाण्यापूर्वी किंवा ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी कोविड-19 चा बूस्टर डोस (Covid-19 Booster Dose) घेतला असल्याचा पुरावा दाखवावा लागणार आहे. मॅक्रॉन पुढे म्हणाले, '15 डिसेंबरपासून, तुम्हाला तुमच्या आरोग्य पासची वैधता वाढवण्यासाठी बूस्टर डोसचा पुरावा दाखवावा लागणार आहे.'

लोकांना लस घेण्याचे केले आवाहन

मॅक्रॉन यांनी फ्रान्समधील कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या 6 दशलक्ष लोकांना त्यांचे संपूर्ण लसीकरण करण्याचे आवाहन केले. विशेषत: ज्यांनी अद्याप पहिला डोस घेतला नाही त्यांनी तात्काळ घ्यावा. (Vaccination in France). राष्ट्रपतींनी इशारा दिला आहे की, महामारी अद्याप संपलेली नाही. अशा वेळी हिवाळ्यात कोविड-19 आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी लोकांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. दुसरीकडे, बूस्टर डोसबद्दल बोलताना, कोरोना लसीच्या दोन्ही डोसनंतर तिसरा डोस बूस्टर डोस म्हणून दिला जातो. यामधून वृद्धांना विषाणूपासून अधिक संरक्षण प्रदान होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Afghanistan Pakistan Border Tension Drone Strike
Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
Times Square shooting during NBA celebration
Thierry Henry Criticism of Cristiano Ronaldo
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com