Iran: धक्कादायक! इराणमध्ये 5,000 हून अधिक शालेय विद्यार्थिनींना दिले विष

विष देण्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Iran
IranDainik Gomantak

5,000 schoolgirls affects poisoning in Iran: इराणमध्ये पाच हजारांहून अधिक शालेय विद्यार्थिनींना विष दिल्याची घटना समोर आली आहे. इराणी शाळकरी विद्यार्थिनींच्या विष देण्याचे संकट रविवारी अधिक वाढले. यासाठी पन्नासहून अधिक शाळांना लक्ष्य करण्यात आले होते असे अधिकाऱ्यांनी कबूल केले आहे.

एएफपी या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, विष देण्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांमागे कोण जबाबदार आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Iran
'जातीवादी शब्द आणि जीवे मारण्याची धमकी'; प्रियंका गांधींच्या पीएवर अभिनेत्रीने केले गंभीर आरोप

एएफपीच्या वृत्तानुसार, इराणमध्ये नोव्हेंबरपासून जवळपास 900 शाळकरी मुलींना विषारी वायूच्या माध्यामातून ​​विष देण्यात आले. शाळा बंद करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या घटनांमध्ये एकाही मुलीचा मृत्यू झाला नसून अनेकांना श्वसनाचा त्रास, उलट्या, चक्कर येणे आणि थकवा जाणवला आहे.

अहवालानुसार, इराणच्या 30 प्रांतांपैकी 21 प्रांतातील शाळांमध्ये संशयित विषबाधाची प्रकरणे आढळून आली आहेत. नोव्हेंबरमध्ये कौम शहरात देखील विषबाधेच्या घटना समोर आल्या आहेत.

'विष देण्याची प्रकरणामुळे आतापर्यंत 25 प्रांत आणि सुमारे 230 शाळा प्रभावित झाल्या आहेत. तर, 5,000 हून अधिक शाळकरी मुलींना विषबाधा झाली आहे," असे संसदीय तथ्य शोध समितीचे सदस्य मोहम्मद-हसन असफारी यांनी सोमवारी ISNA या वृत्तसंस्थेला सांगितले. आतापर्यंत वापरण्यात आलेले विषाचे प्रकार कोणते आहेत. याबद्दल कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही." असे असफारी म्हणाले.

दरम्यान, या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com