म्यानमारमध्ये 5.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

आज सकाळी 7:56 वाजता म्यानमारमध्ये 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.
Earthquake In Myanmar
Earthquake In Myanmar Dainik Gomantak
Published on
Updated on

आज सकाळी 7:56 वाजता म्यानमारमध्ये (Myanmar) 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. आज सकाळी भूकंप यंगूनच्या नैऋत्येस 260 किमी अंतरावर झाला असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले आहे. (5.0 magnitude earthquake shakes Myanmar)

Earthquake In Myanmar
Elon Musk दहा दिवसानंतर पुन्हा ट्विटरवर अ‍ॅक्टीव; शेअर केले 'हे' 4 ट्वीट्स

वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, रविवारी चीनच्या शिनजियांगमध्येही 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, हा भूकंप चीनच्या शिनजियांग उईघुर स्वायत्त प्रदेशात बीजिंगच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 च्या सुमारास झाला आहे. या भूकंपाची खोली सुमारे 10 किमी एवढी होती. शनिवारी शिनजियांगमध्येही सौम्य तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, दक्षिण इराणमध्ये शनिवारी झालेल्या 6.3 तीव्रतेच्या भूकंपात पाच जणांचा मृत्यू झाला आणि 44 जण जखमी झाले आहेत. राजधानी तेहरानच्या दक्षिणेस सुमारे 1,000 किलोमीटर (620 मैल) अंतरावर होर्मोझगान प्रांतात भूकंपाचा केंद्रबिंदू होता, असे अहवालात सांगण्यात आले आहे. इराणमधील भूकंपानंतर लोक स्वतःच्या बचावासाठी घरातून बाहेर पडत होते. सकाळी झालेल्या भूकंपामुळे इमारती आणि पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले आहे.

Earthquake In Myanmar
नेदरलँडच्या खासदाराने पुन्हा केले नुपूर शर्मांचे समर्थन, 'माफी मागू नका'

इराणमधील (Iran) हा भूकंप अनेक शेजारील देशांमध्येही जाणवून आला आहे. यूएईच्या विविध भागातील रहिवाशांनाही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अलिकडच्या आठवड्यात काही प्रदेशात अनेक मध्यम-तीव्रतेचे भूकंप झाले आहेत. इराणमध्ये दिवसाला सरासरी एक भूकंप होतोच.

इराणमधील बचाव कर्मचारी आता आपत्कालीन घरे पुरवत आहेत आणि भूकंपाच्या केंद्राजवळ राहणाऱ्या लोकांना पाणी आणि वीज पुरवठा पुनर्संचयित करत आहेत तसेच गेल्या महिन्यात पूर्व अफगाणिस्तानातील (Afghanistan) पक्तिकाच्या डोंगराळ भागात झालेल्या भूकंपात किमान 1,000 लोकांचा मृत्यू झाला होता असे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com