चीनी पुरूषांचे गुडघ्याला बाशिंग; तरीही नवरी मिळेना नवऱ्याला

30 million men craving for marriage in China cant find bride
30 million men craving for marriage in China cant find bride
Published on: 
Updated on: 

बीजिंग: जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये(China) जवळजवळ 30 दशलक्ष तरुण लग्नाच्या(marriage) प्रतीक्षेत आहेत, पण त्यांना वधू सापडत नाही. दहा वर्षांतून एकदा होणाऱ्या जनगणनेत(Census) हे उघड झाले आहे. चीनमध्ये अविवाहित पुरुषांची संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा(Population) जास्त आहे. वस्तुतः चीनमध्येही मुलांकडे जास्त लक्ष दिले जात आहे, ज्याचा परिणाम आज चीनमध्ये लग्नासाठी मुलींची(Girl) भासत आहे. (30 million men craving for marriage in China cant find bride) 

113.3 मुलांच्या तुलनेत 100 मुली
दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात म्हटले आहे की ताज्या जनगणनेनुसार मुलींच्या एकूण लोकसंख्येमध्ये थोडीशी वाढ झाली आहे, परंतु लैंगिक असमानतेचा मुद्दा लवकरच सुटण्याची शक्यता काही दिसत नाही. चीनच्या सातव्या राष्ट्रीय लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी जन्मलेल्या एक कोटी 20 लाख बालकांपैकी प्रत्येकी11.3 फक्त मुलं आहेत. आणि 100 च मुली होत्या. तर 2010 मध्ये ही आकडेवारी 118.1 च्या प्रमाणात 100 होती.

म्हणून मुलींची संख्या कमी आहे
प्रोफेसर स्टुअर्ट गीटेन-बास्टेन म्हणाले की आजही चीनमधील बहुतेक कुटुंबांना  मुलाची इच्छा आहे. आपल्याला मुलगाच व्हावा असा आग्रह आहे. म्हणूनच परिस्थिती बिकट बनली आहे. सामान्यत: चिनी पुरुष त्यांच्यापेक्षा वयापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांशी लग्न करतात, परंतु सध्या हे शक्य नाही. त्याचबरोबर प्रोफेसर ब्योर्न एल्परमैन यांनी एक चेतावणी देताना सांगितले की, जन्माला येणाऱ्या मुलांचे लग्न होईल तेव्हा संभाव्य नववधूंची मोठी कमतरता भासू शकते. 

'त्यांनाही मिळणार नाही पार्टनर'
प्रोफेसर ब्योर्न एल्परमैन  पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी जन्मलेल्या या 1.2 कोटी मुलांपैकी 6 लाख मुले मोठी झाल्यावर स्वतःच्या वयाचा जोडीदार शोधू शकणार नाहीत. त्याच वेळी, डेमोग्राफिक प्रोफेसर जियांग क्वानबाओ म्हणाले की, चीनमध्ये एक-बाल धोरण 1979 मध्ये लागू केले गेले आणि 2016 मध्ये हे धोरण मागे घेण्यात आले ज्यामुळे मुलांच्या बाजूने चीनी लोकांचा जास्त कल वाढला आणि गर्भपात करण्याच्या प्रथेला दुजोरा मिळत गेला. चीनमधील प्रजनन दर प्रति महिला 1.3 मुले होता, जो लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी आवश्यक असलेल्या 2.1 पेक्षा खूपच कमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com