बर्फवृष्टीमुळे अमेरिकेत ट्रक आणि कारसह 60 वाहनांची धडक; तीन जण ठार तर अनेक जण जखमी

बर्फवृष्टीमुळे तर वादळामुळे झाला अपघात; 5 वाहनांना लागली आग
Accident due to Snowfall
Accident due to Snowfalldainik gomantak
Published on
Updated on

पेनसिल्व्हेनिया : अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्याने पेनसिल्व्हेनियातील महामार्गावर मोठा अपघात झाल्याचे समोर येत आहे. तर ट्रक आणि कारसह 60 वाहनांची एकमेकांना धडक बसून झालेल्या या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. या अपघातात ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर आणि कारचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. (3 Dead in Snowy Pileup of Dozens of Vehicles in Pennsylvania)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील (America) पेनसिल्व्हेनियातील (Pennsylvania) महामार्गावर बर्फवृष्टीमुळे एकामागून एक अशी 60 वाहने आदळली. या धडकेनंतर यातील काही वाहनांना आगही लागली. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यात बर्फवृष्टीमुळे तर वादळामुळे वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे दिसत आहे. हा अपघात सोमवारी शुयलकिल काउंटीमधील महामार्गावर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात (Accident) सहभागी वाहनांची संख्या 40 ते 60 पर्यंत असू शकते.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेल्या या अपघाताच्या व्हिडीओमध्ये बर्फवृष्टीमुळे (Snowfall) महामार्गावर फारच कमी दिसत असून वाहने एकमेकांवर आदळत असल्याचे दिसत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, वाहनांमध्ये बसलेले प्रवासी व चालक आपली वाहने सोडून पळताना दिसत आहेत. संपूर्ण मार्ग डोंगरांनी वेढलेला असून या दुर्घटनेतील मृतांचा शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

Accident due to Snowfall
Russia-Ukrain War: युक्रेनमधून दुसऱ्या देशात पळून गेलेल्या मुलींची परिस्थिती बिकट

दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुयलकिल काउंटीत ही दुसरी मोठी घटना आहे. घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर आणि कार घसरताना आणि एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. अपघातामुळे 5 वाहनांना आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या 4 रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात झाला. यानंतर आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडिओ ट्विटरवर (Twitter) मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून आतापर्यंत 20 लाख वेळा हा पाहिला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com