Pakistan Blasphemy: पाकिस्तानमध्ये सॅमसंग कंपनीवर ईशनिंदेचा आरोप, 27 कर्मचारी ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या 27 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
Karachi
KarachiDainik Gomantak
Published on
Updated on

स्टार सिटी मॉलमध्ये सॅमसंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर ईशनिंदेचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानमधील कराचीमध्ये (Karachi) गोंधळ आणि तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या 27 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. कराचीच्या स्टार सिटी मॉलमध्ये वायफाय डिव्हाईस बसवण्यात आल्याचा आरोप आहे, ज्यामुळे ईशनिंदा करण्यात आली आहे. (27 employees arrested for defaming Samsung in Pakistan)

Karachi
इराणमध्ये 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपात 3 ठार, UAE मध्येही जाणवले भूकंपाचे धक्के

डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार कराची पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य समजून सर्व वाय-फाय बंद केले आहेत आणि यासोबतच पोलिसांनी ज्या उपकरणातून ईशनिंदा केली होती तेही जप्त करण्यात आले आहे. सॅमसंग कंपनीने या प्रकरणी माफी मागितली असून धार्मिक बाबींवर कंपनीने तटस्थता ठेवल्याचे देखील म्हटले आहे.

QR कोड आणि निंदा

उन्माद जमाव मोबाईल कंपनीच्या बिलबोर्डवरील QR कोडवर आक्षेप घेत होता, जो त्यांना निंदा करणारा आणि अल्लाहचा अपमान करणारा वाटत होता. या क्यूआर कोडमुळे संतप्त झालेल्या जमावाने जाळपोळ केल्यानंतर घोषणाबाजी केली. या प्रकरणाबाबत सोशल मीडियावरही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Karachi
चीनच्या शिनजियांग भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप! 4 जणांचा मृत्यू तर 41 जखमी

सायबर गुन्हे शाखा तपास करत आहे

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या उपकरणांच्या स्थापनेसाठी कोण जबाबदार आहे हे शोधण्यासाठी ते संपूर्ण प्रकरणात फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सायबर क्राईम शाखेसोबत काम करत आहेत आणि याप्रकरणी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी देखील करण्यात येत आहे.

ईशनिंदाबाबत पाकिस्तानात कडक कायदे

पाकिस्तानमध्ये ईशनिंदा हा अत्यंत संवेदनशील मुद्दा मानला जातो आणि ते आरोपी कट्टरपंथी गटांसाठी सोपे टारगेट असतात. ईशनिंदाबाबतही कडक कायदे आहेत, तर गेल्या वर्षी, एका कारखान्यातील कामगाराने श्रीलंकन ​​कामगाराला ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून बेदम मारहाण केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com