माजी जागतिक हेवीवेट चॅम्पियन निकोलाई व्हॅल्युएव्हने रशियासाठी युद्ध लढण्याची तयारी दर्शवली आहे. रशियन सैन्यासोबत युद्धात सहभागी होण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी त्याला आमंत्रण दिल्यानंतर निकोलाई याने तयारी दर्शवली आहे. निकोलाई दोन वेळा WBA चॅम्पियन राहिला असून, त्याची उंची सात फूट आणि वजन 150 किलो आहे. निकोलाई आतापर्यंतचा सर्वात उंच आणि वजनदार विश्वविजेता आहे.
निकोलाई 2009 मध्ये डेव्हिड हेशी याच्यासोबत लढला होता. निकोलाई याची ही अखेरची लढाई होती. दोन वर्षांनंतर निकोलाईने रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या युनायटेड रशिया या पक्षात प्रवेश केला. पुतिन यांनी त्याला सैन्यात बोलावले असून, त्याचा पुढील आठवड्यात भरती करण्याचा विचार आहे.
निकोलाई, 'इझवेस्टिया' या रशियन मासिकाशी संवाद साधताना म्हणाला, "मी आता नावनोंदणी कार्यालयात जाणार आहे. माझे सहकारी (खासदार) खूप चांगले आहेत. मला डॉनबासच्या प्रवासापूर्वी समन्स प्राप्त झाले आणि मी घरी नव्हतो. मी नक्की जाईन आणि पुढील आठवड्यात नावनोंदणी कार्यालयात तक्रार करेन."
निकोलाई यांच्यावर 2010 मध्ये हाडं आणि सांध्याच्या गंभीर समस्यांमुळे उपचार करण्यात आले होते. तसेच, त्यासंबधित शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. याच कारणामुळे निकोलाईने बॉक्सिंग करिअर मधून निवृत्ती घेण्याचा विचार केला. असे असतानाही पुतिन यांच्या विनंतीवरून निकोलाई युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आहे. देशाची सेवा करण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचा संदेश निकोलाई याने दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.