"10 सेकंदांपेक्षा कमी काळ स्पर्श करणे लैंगिक छळ नाही;" कोर्टाच्या निर्णयामुळे इटालीत #10secondi चा उदय, जाणून घ्या संपूर्ण प्रकार

Italy News: मी आता विचार करत आहे की मी या व्यवस्थेवर विश्वास ठेवला तो चुकीचा होता का? हा न्याय नाही.
#10secondi
#10secondiDainik Gomantak
Published on
Updated on

Touching for less than 10 seconds is not sexual assault: इटलीच्या सोशल मीडियावर #10secondi सध्या ट्रेंड करत आहे. लोक या हॅशटॅगसह व्हिडिओ बनवत आहेत ज्यात ते 10 सेकंद त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर हात ठेवून काही संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच "10 सेकंदांपेक्षा कमी काळासाठी एखाद्यावर लैंगिक अत्याचार झाला तर तो लैंगिक अत्याचार मानला जाणार नाही का?", असा प्रश्नही विचारत आहेत.

खरं तर, इटालियन कोर्टाने लैंगिक छळ प्रकरणात एका पुरुषाला दिलासा देत म्हटले आहे की, त्याने मुलीच्या प्रायव्हेट पार्टला 10 सेकंद स्पर्श केला.

सोशल मीडियावरुन आंदोलन

इटलीतील एका व्यक्तीने मुलीशी छेडछाड केल्याचे कबूल करूनही लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

कारण? हा प्रकार गुन्हा ठरवण्यासाठी "पुरेसा वेळ" टिकला नाही. या घटनेमुळे देशात संताप निर्माण झाला आहे, लोक या प्रकरणावर उपहासात्मक टिप्पणी करण्यासाठी सोशल मीडियावर "ब्रीफ ग्रॉपिंग" किंवा 10 सेकंद असे हॅशटॅग वापरत आहेत.

शाळा आणि न्याय व्यवस्था या दोघांकडून माझी फसवणूक झाली आहे. मी आता विचार करत आहे की मी या व्यवस्थेवर विश्वास ठेवला तो चुकीचा होता का? हा न्याय नाही.
पीडिता

17 वर्षांच्या मुलीशी शिपायाचे गैरवर्तन

हे प्रकरण एप्रिल 2022 चे आहे. यामध्ये रोममधील एका हायस्कूलमधील 17 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, ही मुलगी वर्गात जाण्यासाठी जिना चढत असताना शाळेच्या शिपायाने कथितपणे तिची पँट खाली ओढली, तिच्या नितंबांना स्पर्श केला आणि तिचा अंतर्वस्त्र पकडला. त्यानंतर तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली.

#10secondi
PM Modi In France: "आपण जिथे जातो तिथे मिनी इंडिया तयार करतो..." पंतप्रधानांच्या पॅरिसमधील भाषणातील दहा मुद्दे

गुन्हा ठरवायला वेळ अपुरा

न्यायालयीन सुनावणीदरम्यान, त्या व्यक्तीने मुलीला छेडछाड केल्याचे कबूल केले आणि ते 'मस्करी'मध्ये झाल्याचे सांगितले. सरकारी वकिलाने साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची मागणी केली.

मात्र, या आठवड्यात शिपायाची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. ही घटना 10 सेकंदांपेक्षा कमी काळ चालली आणि त्यामुळे गुन्हा ठरविण्याच्या निकषांची पूर्तता होत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी निर्दोष सुटकेचे समर्थन केले.

#10secondi
Khalistani Activists: खलिस्तानी समर्थकांचा उन्माद; सिडनीमध्ये भारतीय विद्यार्थ्याला रॉडने बेदम मारहाण

सेलिब्रेटींचा पुढाकार

या निर्णयानंतर, #10secondi या हॅशटॅगसह "palpata breve" किंवा "brief groping" नावाचा इटलीमधील Instagram आणि TikTok वर एक नवीन ट्रेंड उदयास आला.

इटालियन लोकांनी व्हिडिओ पोस्ट करणे सुरू केले आहे. ते शांतपणे कॅमेराकडे टक लावून 10 सेकंदांच्या कालावधीसाठी त्यांच्या अंतरंग भागांना स्पर्श करतात दिसत आहेत.

हा ट्रेंड "व्हाइट लोटस" या मालिकेतील अभिनेता पाओलो कॅमिली याने सुरू केला होता आणि तेव्हापासून हजारो लोकांनी त्याचे अनुसरण केले आहे.

29.4 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्ससह इटलीतील सर्वात प्रसिद्ध प्रभावशाली चियारा फेराग्नी यांनी देखील यापैकी एक व्हिडिओ पुन्हा पोस्ट केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com